Senior Citizen India | राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत लोकांच्या हितासाठी लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशी एक योजना शिंदे सरकारने सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. योजनेचा लाभ कसा मिळणार ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Senior Citizen India)
राज्य सरकार अंतर्गत नागरिकांच्या हितासाठी अनेकांच्या लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशाच एक योजनेला मान्यता देण्यात आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेतून 65 वर्षावरील (Senior Citizen India) जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित 65 वरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
तसेच यामध्ये अपंगत्व अशक्तपणाचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मन स्वस्त केंद्र व योग्य उपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याची अंमलबजावणी ग्रामीण भागातील जिल्हाधिकारी व शहरा भागांसाठी आयुक्तामार्फत केली जाईल. यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येईल. लाभार्थ्यांची तपासणी तसेच पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.