राज्यातील या भागात होणार अवकाळी पाऊस व गारपीट हवामान तज्ञाचा अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert | अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. पूर्व विदर्भ क्षेत्रातील अनेक जिल्ह्यात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये बऱ्याच दिवसापासून तापमानामध्ये चढ-उतार सुरू आहे. आता पूर्व विदर्भ क्षेत्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रविवारी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये काही भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानामध्ये मोठा बदल अपेक्षित आहे या तीन जिल्ह्यासह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि नांदेड तसेच अमरावती या जिल्ह्याच्या पूर्व भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच या भागामध्ये गारपिटीचा ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. असा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांविषयी काळजी घ्यावी लागणार आहे व त्यांना यासाठी मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा चक्रवात, रॉयल सीमा तेलंगाना व दक्षिण छत्तीसगड मधून विदर्भाकडे येत आहे. त्यामुळे हवेत आद्रता असेल. आणि 24 फेब्रुवारीला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच 25 फेब्रुवारीला बुलढाणा अकोला अमरावती वाशिम चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच नागपूर यवतमाळ भंडारा वर्धा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 25 फेब्रुवारी रोजी विजांच्या कडकडाटासह विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील येत्या 48 तासांमध्ये किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही त्यानंतर किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे

Leave a Comment

error: Content is protected !!