Punjab Duck New Weather Forecast | ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी नुकताच एक हवामान अंदाज वर्तवला होता. या दिलेल्या हवामान अंदाज मध्ये पंजाबराव यांनी येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पंजाबराव यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे राज्यातील 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणारा व ढगाळ हवामान राहणारा असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
सांगायचे झाले तर पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज खरा ठरलेला आहे. यामुळे तर पंजाबरावांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी लागताना दिसत आहे.
( संपूर्ण बाजार समिती भाव जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल.+91 85304 77302 हा आमचा व्हाट्सअप नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा जेणेकरून तुम्हाला बाजारभाव विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल)
विदर्भामध्ये सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच दुपारच्या सुमारास मोताळा तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलेली सुद्धा पाहायला मिळाली आहे.
यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि जनावरांच्या चाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील ओवा या गावात आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास गेलेला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाज खरा ठरला असल्याने, आता पुढील काही दिवस राज्यातील कोणकोणत्या भागात अवकाळी पाऊस बसणार याबाबत पंजाबराव यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे.
नवीन अंदाजानुसार पंजाबराव काय म्हणतील हे जाणून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. याबाबत अनेकांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता आपण पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाजा बदल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाबराव चा नवीन हवामान अंदाज
पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार नऊ जानेवारीपर्यंत राज्यात बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहणार आहे.
या दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये खूप मोठा पाऊस पडणार नाही मात्र रिमझिम पावसाचा अंदाज यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
तसेच या दरम्यान विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.