पंजाब डक नवीन हवामान अंदाज : राज्यातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस, शेतकरी मित्रांनो काळजी घ्या

0
Punjab Duck New Weather Forecast

Punjab Duck New Weather Forecast

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck New Weather Forecast : राज्यातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी महत्त्वाची व अतिशय चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. ती बातमी म्हणजे राज्यावर सध्या आलेले अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. राज्यामध्ये काही जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज समोर आलेला आहे.

खरंतर दोन दिवसापासून राज्याच्या हवामानामध्ये बदल झालेला दिसून येत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानामुळे थोडीशी कमी होत आहे. त्याचा परिणाम राज्यात गारठा वाढलेला दिसून येत आहे त्यामुळे रब्बी पिकांना याचा फायदा मिळेल असे बोलले जात होते.

परंतु नोव्हेंबर महिन्यात 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर यादरम्यान राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे व चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेला अवकाळी पावसामुळे ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पीक पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी मान्सून काळात पाऊस नव्हता त्या ठिकाणी हा अवकाळी पाऊस देखील दिलासा देऊन गेला.

अशाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे ज्येष्ठ हा मान तज्ञ पंजाबराव ढोक यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट असल्याचे सांगितले आहे यामध्ये त्यांनी राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी 18 आणि 19 डिसेंबर 2023 रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार आणि काही भागात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मध्य महाराष्ट्रातील व मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ओळख ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सोलापूर, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानाची शक्यता असेल असा अंदाज दिला आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असेही सांगितले जात आहे.

परंतु हा पाऊस सर्व दूर पडणार नाही सोलापूर जिल्ह्यातील काही भागात, अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल असे सांगितले गेले आहे. तसेच 20 डिसेंबर 2023 पासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे अशी देखील त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाज मध्ये सांगितले आहे. तर हा अंदाज कित्येक खरा ठरतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!