PM Kisan Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. याच आधारावर पीएम किसन योजना देखील शेतकऱ्यांसाठी मोठी वर्धनकारक योजना ठरते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांच्या हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत.
मागील काही महिन्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे सोबत वितरित करण्यात आले होते. परंतु आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची आशा लागली आहे. परंतु मागच्या हप्त्या पासून बरेच शेतकरी वंचित राहिले होते. केवायसी आधार सीडींग यासारख्या कारणामुळे शेतकऱ्यांना या योजनेमधून वगळण्यात आले आहे. जर तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा असेल तर लवकरात लवकर या गोष्टी पूर्ण करा.
कोणते शेतकरी अपात्र आहेत
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केव्हाही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहेत. अशा सूचना कृषी विभागांनी दिलेले आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत पंधरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करीत 98 टक्के काम पूर्ण केले आहे. तर मालेगाव सह बारा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी पूर्ण केलेली नाही.
तर काही शेतकऱ्यांनी फक्त गुंतवणुकीसाठी शेती घेऊन ठेवली आहे. व त्यांचे स्थलांतर झाल्याने अशा शेतकऱ्यांपर्यंत संपर्क होऊ शकत नाही. ग्रामपंचायत इकडून संबंधित शेतकऱ्यांना केव्हाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
केवायसी पूर्ण असेल तरच मिळणार हप्ता
किसन सन्मान निधी योजना अंतर्गत नागरिकांना सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. यात आणखी सहा हजार रुपयांची भर घालणारी नमो महासंबंधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. दहा ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. केव्हाचे पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.