PM KISAN YOJANA | केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या योजनेचा लाभ देशभरातील लाखो शेतकरी घेत आहे. या योजनेमध्ये आरोग्य विभाग गृहनिर्माण रेशन पेन्शन अशा अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान योजना.
( शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा )
या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वर्षाकाठी सहा हजार हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. योजनेचे तीन हप्ते चार महिन्याच्या टप्प्यामध्ये दोन हजारांच्या संख्येमध्ये वितरित केली जातात. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत. लवकरच या योजनेचा सोळावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या योजनेचा लाभ न मिळाला तर काय करावे व या योजनेमध्ये तुमचे नाव आहे का नाही. हे जाणून घ्यायचे असेल. तुमचे स्टेटस तपासून तुमचे जाणून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया स्टेटस तपासण्याची पद्धती.
या पद्धतीने पहा यादीमध्ये नाव ( View the name in the list in this way )
- सर्वात प्रथम तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान योजने मध्ये सहभाग घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सोळाव्या हाताचा लाभ मिळू शकतो.
- तर यासाठी तुम्हाला योजनेचा अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.inवर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे शेतकरी पोर्टलवर अनेक पर्याय दिसतील.
- त्यानंतर तुम्हाला थोडीशी खाली येऊन लाभार्थ्यांचा पर्याय दिसेल.
- व त्यानंतर दिलेल्या नावावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडा.
- त्यानंतर तुम्हाला Gate details वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तिथे तुमच्या गावाची यादी उघडेल जात लाभार्थी आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
पीएम किसन योजनेचा सोळावा हप्ता या तारखेला होणार जमा ?
पीएम किसन योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. आता सोळावा हप्ता लवकरच जारी करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा हफ्ता फेब्रुवारी मार्चमध्ये जरी केला जाईल. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.