Onion MarketOnion Market
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market : राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. आत्ताच राज्यत कांद्याच्या दरात पुन्हा एकदा भाव वाढ होऊ लागली आहे. खरं तर गेल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक वाढली होती.

याचाच परिणाम म्हणून बाजारभावातील किंचित घसरन पाहायला मिळाले. असेच मात्र, गेल्या राज्यात काही दिवसापासून गारपीट होत आहे. सव्वीस तारखेला राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून खतनाम असलेला नाशिक जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. याशिवाय राज्यातील विविध भागांमध्ये 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पाऊस सुरू आहे.

या अवकाळी पावसाचा व गारपडीचा फटका शेत पिकांना बसलेला आहे. यामुळे राज्यातील लाल कांदा आणि रांगडा कांदा झाला पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.

याशिवाय कांदा चाळीस साठवलेला उन्हाळी हंगामा मधील माल देखील यामुळे खराब होणार आहे. ढगाळ हवामान आणि वलव्यामुळे कांदा चाळ येथील माल खराब होत आहे. याशिवाय भविष्यात कांद्याचा मोठा निर्माण होण्याची शक्यता तयार होत आहे.

हेच कारण आहे की सध्या बाजारामध्ये कांदजारात थोडीशी वाढ झाली आहे. आजच्या लिलावात देखील महाराष्ट्रातील काही बाजारामध्ये कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.

भाव चांगला मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता आपण आज राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला विक्री भाव मिळाला आहे. हे जाणून घेणार आहोत.

कुठे मिळाला विक्रमी भाव

गेल्या आठवड्यापर्यंत दबावत असलेला कांदा बाजार भाव पुन्हा एकदा सुधारू लागले आहेत.आज राज्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगली सुधारणा झालेली दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेता वरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमाल 5500 प्रतिक्विंटल एवढा भाग मिळाला. तर याबाजारात आता कांद्याच्य आगाराच्या घरात पोहोचलेला आहे.

शिवाय भाव वाढ झाली असल्याने आगामी काळात जर आणखी वाढ होईल. अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान एक हजार तीनशे रुपये कमाल पाच हजार पाचशे रुपये सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *