Monsoon Update : भारतीय हवामान खात्याने पुढील 48 तासामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तलेली आहे. तमिळनाडू आणि केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
देशासह राज्यामध्ये अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. राज्यसेवा देशाच्या काही भागांमध्ये पावसाची सह्याद्री पहिला मिळणार आहे पश्चिम भारतात व पुढील 48 तासांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे तमिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे गुजरात राजस्थान या राज्यांमधून मान्सून परतला आहे.
भारतीय हवामान खात्याकडून केरळ ला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून, तिरुअनंतपुरम सह आसपासच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे केरळमधील कोल्लम, अलप्पुझा, पठाणमथिट्टा तसेच इडुक्की जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याचा हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान विभागाने नागरिकांना खबरदारीचा उपाय करा याची आवाहन केलेले आहे पाणी साचलेल्या भागात कच्चा रस्ते अशा ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान विभागाने 17 आणि 18 ऑक्टोबरला देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश जम्मू आणि कश्मीर लडाख येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवलेला आहे.