लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट! महिलांना दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार, जाणून घ्या सविस्तर..

0
Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जातो. मात्र आता या योजनेच्या नियमासंदर्भात एक नवीन बातमी समोर येत आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच महिलांच्या खात्यात आठव्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. मात्र त्या अगोदर या योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरवर्षी या योजनेची ई-केवायसी करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनेच्या घोषणेमुळे निधीच्या कमतरतेमुळे सरकारला आखडता हात घ्यावा लागत आहे. याच दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत काही बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

हे पण वाचा | पीएम कुसुम योजनेअंतर्गत 45 हजार रुपये अधिक सबसिडी ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार? पहा सविस्तर..

मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया लाभार्थी महिलांना करावी लागणार आहे. या प्रक्रियेद्वारे लाभार्थी महिला आयात आहे का नाही किंवा लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषाचे पालन करत आहे का याची तपासणी केली जाणार आहे. यानंतरच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Mazi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट आहे. मात्र या अटीचे उल्लंघन करून अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत माहिती घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेत आहे. प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात आली आहे. त्यातून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे.

हे पण वाचा | फेब्रुवारी महिन्यात ‘या’ लाडक्या बहिणी होणार अपात्र; काय कारण? वाचा सविस्तर

दरम्यान दुसऱ्या मार्गाने ह एखादी लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल असे आढळून आल्यास संबंधित महिला अपात्र करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही बहिणींनी निकषा बाहेर असून देखील या योजनेचा लाभ घेतला आहे हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नको यासाठी अर्ज केले आहेत. शासनाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.

यामध्ये दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. एक लाख दहा हजार महिला या 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आहेत. तर महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, तो इच्छेने योजनेतून नाव माघारी घेणाऱ्या अशा एकूण महिला एक लाख 60 हजार एवढे आहेत. अशाप्रकारे एकूण पाच लाख पेक्षा जास्त महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!