Land Record Maharashtra | आता बरेच जण शेतजमीन हे विकत घेत असतात. याप्रमाणे सरकारने आता या जमीन विक्रीमध्ये एक शेती कायदा म्हणून एक कायदा आणलेला आहे. तर त्या कायद्याबद्दल काय माहिती आहे, ते आपण पाहू. व तसेच जमिनीचे टायरल हे कसे तपासायचे, याची सुद्धा आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
यामध्ये प्रामुख्याने आपल्या हक्काबद्दलची माहिती करणे, व तसेच आपल्या हक्कांबाबत तपासण्या व शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची प्रक्रियाच आहे. आता आपल्या रोजच्याच व्यवहारांमध्ये त्याला सरळ भाषेत टायरल तपासणे असे सुद्धा म्हणतात. तर आपण यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कांबाबत काय विचार आहेत. ते आपण त्यामध्ये पाहणार आहोत.
जमीन
यामध्ये प्रामुख्याने जे शेती आपण वापरत नाही. त्या शेतीचे जिल्हाधिकारी आदेश करत नाही तोपर्यंत, आपण प्रत्येक जमीन ही शेत जमीन म्हणूनच ओळखतो. व जर एखादी जमीन ही शेत जमीन आहे की बिनशेत जमीन आहे. याबाबतचा प्रदर्शनी माहिती म्हणजेच आपला सातबारा उताऱ्यामध्ये मिळून जाते. त्यामुळे आपण सातबारा उतारामध्ये महसूल कर आणि इतर पुरावे सादर व पिक पेरा सादर हे पाहणं खूप आवश्यक असते.
व आपल्या जमिनीचा वापर हा बिनशेतीकडे जर असल्यास त्यामध्ये आकार हा सदरामध्ये तसा उल्लेख केलेला असतो. व आकार या सदरामध्ये जर आपण बिनशेती असा प्रमाणे उल्लेख त्यामध्ये केला नसल्यास, तर ती जमीन किंवा जमिनीचा तुकडा हा शेत जमीन आहे. असे म्हणून यामध्ये स्पष्ट केले जाते.
जमिनीचा झोन
यामध्ये महानगरपालिका व नगरपालिका या हद्दीतील जमीन पहा.
यामध्ये प्रामुख्याने जमिनीचा झोन याबाबतची माहिती आपण महानगरपालिका व नगरपालिका यांच्या डेव्हलपमेंटद्वारे एक प्लॅन तयार केलेला असतो. त्या प्लॅनमध्ये या जमिनीच्या पूर्ण जॉन बद्दलची जी माहिती असते, ती माहिती आपल्याला तिथे मिळते. जर जमिनीच्या एखादा खरेदीदार जर जमिनीचा झोन काय आहे ? याची त्याला काहीच माहिती नसते.
त्यामुळे, जो खरेदीदार आहे तो कोणत्यातरी कारणासाठी जमीन विकत घ्यायचे आहे. पुरेपूर चौकशी किंवा माहिती करतो. का व ती माहिती करणे आवश्यकच असते. खरेदी दाराकडून जर एखादी जमीन खरेदी करण्याचा जर हेतू समजला, तर ती जमीन ही खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर असल्यास त्यामध्ये त्या जमिनीचा झोन हा कोणत्या प्रकारे आहे याची सर्व डेव्हलपमेंट प्लॅन मधून माहिती ही गोळा करून घेणे हे फार आवश्यक असते.
आता तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, की या जमिनीच्या जूनमध्ये किती प्रकारचे झोन असतात. तर या जमिनीच्या झोनमध्ये ग्रीन बेल्ट, शेती झोन, नो डेव्हलपमेंट झोन, रहिवासी झोन, कर्मशियल झोन, अशा इतर प्रकारचे यामध्ये झोन असतात. व तसेच नगरपालिकेकडून व किंवा नगर महानगरपालिकेकडून या अधिकृतरित्या दाखला जो असतो तो घेतला जातो. व सदरच्या जमिनीस अर्बन लँड सिलिंग एकट्याच्या तरतुदी ला याप्रकारे लागू होते, किंवा कसे याबाबतचे कागदपत्र पाहणे असते ते आवश्यक आहे. तर याचा सर्व पुरेपूर तपशील हा पुढे नमूद केलेला आहे, तो आवर्जून पहा.
नगरपालिका व महानगरपालिका यांच्या हद्दीच्या बाहेरील जी जमीन आहे, त्या जमिनीची माहिती. या नगरपालिका व महानगरपालिका यांच्या बद्दल तुम्हाला थोडेफार तर माहीतच असेल, की यांच्या आद्यबाहेरची जी जमीन असते ती जमीन गावठाणाचे क्षेत्र वगळता रिजनल डेव्हलपमेंट या प्रकारचा एक प्लॅन तयार केलेला असतो. तर त्याला प्रत्यक्षात रीजनल प्लॅन म्हणून त्याला ओळखले जाते.
या प्लॅनची माहिती करून तुम्ही जमिनीच्या झोन बद्दलची माहिती सुद्धा गोळा करू शकता. अधिकृत दाखला घेता येतो, त्याबाबतचा तुम्हाला तर नगरपालिका व महानगरपालिका यांच्या व्यतिरिक्त जर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत जी जमीन असते. त्याबाबतचा अद्याप रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन हा लागू करण्यात आलेला नाही.
जाणून घ्या जमिनीच्या मालकीच्या हक्काची चौकशी,
जर तुम्हाला तुमच्या मालकी हक्काच्या जमिनी विषयी माहिती करायचे असेल, तर ती तुमच्या हद्दीच्या बाहेर आहे. कारण, ती माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यावा लागतो. आणि या मालकी हक्क बाबत काही जर तुम्हाला कागदपत्र पाहिजे असेल, तर त्याचा तपशील तुम्हाला खालील प्रमाणे आहे. तो तपशील तुम्ही आवर्जून पहा.
या चालू असलेल्या वर्षाचा 7/12 उतारा
मागील 35 वर्षांचे जुने 7/12 उतारे
या 7/12 उतारामध्ये नमूद केलेल्या या सर्व 6 ड च्या फेरफारांच्या नोंदी.
या फेरफारांच्या नोंदी व या विशिष्ट हुकूमांमुळे करण्यात आलेल्या असतील तर, त्या काही नोंदी नमूद केलेल्या हुकूमांच्या प्रति.
या फेरफार नोंदीमध्ये जमीन हस्तांतरण च्या बाबतीमध्ये घातलेल्या बंधनातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी व हस्तांतरणाबाबत कोणत्यातरी परवानग्या व ना हरकत दाखले आणि हुकूम अगर इतर आदेश मिळणे हे आवश्यक आहे. याची सर्व माहिती.
वारसा नोंदणी मध्ये काही नमन केलेल्या वारसांची नावे पाहणे व फेरफार नोंदणी मध्ये काही नमूद केलेल्या मयत व्यक्ती सुद्धा फेरफार नोंदीमध्ये नमूद केलेल्या वारसा व्यतिरिक्त आणखीन काही वारस आहेत की नाही, किंवा कसे याबाबतची सर्व खात्री करून घेणे.
यामध्ये हिंदू वारसा कायद्यातील सन 2005 च्या काही दुरुस्तीनंतर वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलालां सोबत व मुलींना काही स्थावर मिळकतीमध्ये काही हक्क देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये वारसा नोंदी मध्ये जे नमूद केले गेलेल्या मयत खातेदारास मुले होत्या किंवा कसे याबाबतची चौकशी व माहिती करून घेणे आवश्यक आहे.
या आता चालू असलेल्या वर्षाचा सातबारा उतारा मध्ये ज्या व्यक्तीचे नाव आलेली आहेत, अशा व्यक्तींच्या मुलांबद्दल व मुलींबद्दल काही माहिती करणे आवश्यक असते व एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर वारस नोंदीमध्ये त्या व्यक्तीच्या पत्नीचे किंवा मुला मुलींचे वारस म्हणून, नाव लावता येते. परंतु, अशा या व्यक्तीच्या नातवांची नावे वारसा नोंदीमध्ये येत नाहीत.
जाहीर नोटीस पहा.
यामध्ये प्रामुख्याने टायटल तपासणीसाठी जाहीर नोटीस ही प्रसिद्ध करणे फारच आवश्यक असते. व आपल्या काही मिळकतीच्या हस्तांतरणाबाबतचे सर्वच लेकर नोंदवणे सुद्धा यामध्ये बंधनकारक नसते, तर यामुळे नोंदवले गेलेले नाहीत. असे काही लेख जे अस्तित्वात असल्यास त्याची सर्व माहिती ही जाहीर नोटीस च्या माध्यमातूनच मिळू शकते.