Cotton Price : राज्यामध्ये यंदा वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर पिकवलेले पांढरे सोने आता, भाव घसरल्याने काळवंडल्याचे दिसून येत आहे. गती वर्षाच्या तुलनेत कापूस दरात सध्या दोन हजार रुपयांची घट झालेली दिसून येत आहे.
जुलैमध्ये पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली व नंतर पावसाने आकारता घेतल्याने पाण्याविना पिके सुकवून गेलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी आहे त्यांनी पाण्यावर कपाशी पिकवली दिवाळीनंतर आता बाजार समिती कापूस खरेदी सुरू झाली असून, सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. दरवर्षीपेक्षा कापसाची लागवड कमी असताना देखील भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. कापसाला हमीभाव ठरवून द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघेना बियाणे, खत, मशागतीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी नेमकं शेती कशी, करायची असा शेतकऱ्यांमध्ये पडलेला आहे.
बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक भुर्दड सहन करावी लागत आहे. कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीत. वेचणीचा दर ही बारा रुपये किलो पर्यंत वाढला आहे. त्यात बाजारात कमी भाव मिळत आहे. यामुळे गतीवर्षी एकवीस हजार एकर क्षेत्रावर असलेली कपाशी यंदा सतरा हजार एकर क्षेत्रात आलेली आहे. चार हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.
सध्याचा बाजार भाव सात ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे . गजवर्षी काही दिवस 9 हजारापर्यंत भाव मिळाला. त्यामुळे भाव वाढीचे अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.