राज्यात गारठा वाढलाय, हवामान विभागाने स्पष्ट सांगितले | weather forecast

0
weather forecast

weather forecast

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

weather forecast : हवामानात सातत्याने बदल होत आहे. सध्या राज्यातील काही भागात थंडीचा पारा चांगला वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान 12 अंशखाली घसरला आहे. नाताळ पर्यंत कोकणात देखील तापमानाचा किमान पारा खाली येण्याची अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 अंशाखाली खाली गेले आहे. सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात झालेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात 8.7 अंश सेल्सिअस तापमानाचे नोंद झाली आहे.

राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यामधील किमान तापमान १२ अंश खाली गेले आहे त्यामुळे हूडहूड वाढली आहे. विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गोंदिया नागपूर वाशिम मधील किमान तापमान एक अंशावर आले आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत . विदर्भासोबतच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा बारा चांगलाच घसरला आहे.

विदर्भात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान

यवतमाळ मध्ये 8.7 अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर मध्ये 9.4, गोंदिया मध्ये 9.2, नागपूर मध्ये 9.8, वाशिम मध्ये 9.8, बुलढाणा मध्ये 11, ब्राह्मणपुरी मध्ये 11, अकोला मध्ये 11.4, वर्ग आणि अमरावती मध्ये 10.6,

विदर्भा बरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान दाखवण्याचा परा चांगलाच घसरला आहे. तापमान घडल्यामुळे चांगलीच हुडहुड भरली आहे. मध्य महाराष्ट्रातील तापमान 11 ते 15° दरम्यान आहे.

मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कधी तापमान ?

पुण्यामध्ये 12 अंश सेल्सिअस, जेऊर 12, जळगाव 11.7, मालेगाव १३, महाबळेश्वर 12.9, कोल्हापूर 16, नाशिक मध्ये 16.4, अहमदनगर मध्ये 11.5, सोलापूर मध्ये 15.5, साताऱ्यामध्ये 15.1, सांगलीमध्ये 15.8,

मराठवाड्यातील देखील थंडी वाढायला सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातील बहुत नाशिक जिल्ह्यात तापमानाचा परा घसरला आहे. आणि ठिकाणी अकरा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाचा पारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!