Ration Card Update : शिधापत्रिका ऐवजी ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. जिल्ह्यातील सेतू महा सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र चालकांना लवकरच या प्रक्रियेच्या प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका आता इतिहासात जमा होण्याच्या अखेर टप्प्यावर आलेली आहे.
समाजातील गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्यात आली. एका कुटुंबासाठी एक शिधापत्रिका दिली जात होती. कुटुंबातील लहान आणि मोठ्या व्यक्तींना प्रमाणात धान्य दिले जात होते.
केंद्राने राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना द्वारे धान्य दिले जाते. राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य दिले जाते. अनेक कुटुंबे हे काम धंदा निमित्त मूळ गावी राहत नाही. त्यांची शिधापत्रिकेवर गावाकडचा पत्ता असे, त्यांना धान्य ही गावाकडील स्वस्त धान्य दुकानात मिळत. मात्र, हे कुटुंबे गावी राहत नसल्याने धन्य घेण्यासाठी त्यांना जाता येत नव्हते. शासनाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता.
स्वस्त धान्य दुकानदारी बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेले धान्याची परस्पर काळा बाजारात विक्री करत. या घरकुत्याचा प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आलेली.
बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागत. पुरवठा विभागाच्या देखरेख एखादी ही प्रक्रिया पार पडली जात होती. बारा अंकी क्रमांका नंतर कोणतेही स्वस्त धान्य दुकानातून हाताचे ठसे देऊन त्यांनी घेता येत होते. गोरगरिबांना सण उत्सव साजरे करण्यासाठी आनंदाचा शिरा शंभर रुपयांमध्ये दिला जात. होता ज्यांचे राशन कार्ड हे ऑनलाईन केले जात आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली सर्व शिधापत्रिका प्रत्येक्षित देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढील काळात ई -शिधापत्रिका दिल्या जाणार आहेत.
ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना ई -शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसील या कागदपत्रांची पडताळणी करून ई शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल मध्ये कागदपत्रे अपलोड करता येणार नाही. अशा नागरिकांना सेतू महा सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रात जाऊन ई शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपडेट करता येणार आहेत.