राज्यात या तारखेला हवामान खात्याचा मोठा इशारा! तुमच्या भागातील हवामान अंदाज जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update August : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून पाऊस अचानक गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झालेली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याचा (IMD) अंदाज आल्याने शेतकऱ्यांसाठी हा दिलासा ठरणार का? भारतीय हवामान खाते नुकताच कोणता नवीन अंदाज दिला आहे. याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये आपण जाणून घेण्याची प्रयत्न करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत होत्या परंतु घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस पडल्याने या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेल आहे अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आल्याने या ठिकाणी हवामान खात्याचे सूचनाच पालन करणे खूप गरजेचे आहे. Maharashtra Weather Update August

पुढील पाच दिवस काय अपेक्षित आहे?

हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, पुढील पाच दिवस राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या पाच दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा पाऊस सौम्य पण सातत्यपूर्ण टप्पा आणखी काही काळ टिकू शकतो. शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे दिलासादायक ठरू शकतात, हा पाऊस घाटमाथा भागात मध्यम स्वरूपाचा पडणार आहे.

राज्यातील हवामान तज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात पुढील पाच दिवस ही स्थिती सर्वसाधारण राहणार असून काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मात्र या भागातील पावसाची तूट अजून एक चिंताजनक आहे. एक जून पासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर नागपूर शहरात सरासरीच्या तुलने तब्बल 25% कमी पावसाची नोंद झाली आहे, तर संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर ही तूट 18 टक्यांवर पोचलेली आहे. हवामान तज्ञ यांच्या मते याला अल निनो (El Nino) हा कारणीभूत आहे. सध्या तयार होणाऱ्या हवामान प्रणाली कमजोर ठरत असल्याने त्याचा परिणाम म्हणून पाऊस कमी होत आहे.

तसेच देशाच्या इतर भागांमध्ये गंभीर इशारा असताना मात्र महाराष्ट्र मध्ये सौम्य हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा यामुळे झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्या वाहण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर ही पाहायला मिळू शकतो.

( टिप: वरील माहिती भारतीय हवामान विभाग ( IMD) आणि नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजावर आधारित आहे. योग्य आणि स्थानिकी माहितीसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)

हे पण वाचा : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! मान्सून कधी होणार महाराष्ट्रात राहतो सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!