IMD Weather Update Maharashtra : राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. यामुळे सगळ्यांचीच लक्ष आता हवामान अंदाज कडे लागलेले आहेत. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) राज्याच्या हवामानाबाबत पुढील 24 तास महत्त्वाचे आहे, अशी माहिती दिलेली आहे. परंतु राज्यात कुठल्या भागात कसं वातावर राहणार कुठे पाऊस पडणार व कुठल्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा हा हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लेख पूर्ण वाचा.
सध्या राज्यात मुसळधार पावसाच सत्र सुरू झालेल आहे आणि राज्यभर पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये देखील रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे, तसेच सकाळपर्यंत पाऊस शांत झालेला आहे. तसेच आता या पावसाने मध्यंतरी विश्रांती घेतली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चित निर्माण झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुल्ल आहे. तरी भारतीय हवामान खात्याने( Imd) पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. कोकण आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील पंधरा तासासाठी राज्यात विशेष सावध मानले जात आहे.
हे पण वाचा Panjab duck Weather forecast – पंजाब डक हवामान अंदाज
एकाच वेळी अनेक हवामान प्रणाली सक्रिय
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या वातावरणात मागचं कारण म्हणजे एकाच वेळी सक्रिय झालेल्या अनेक हवामान प्रणाली. राजस्थान परिसरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल असून, ओराई, सिधी, बंकुरा ते मनिपुर पर्यंत एक विस्तारणीय कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याशिवाय गुजरात पासून उत्तर केरळ पर्यंतच्या सर्व किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या साऱ्या प्रणालीच्या एकत्रित परिणामामुळे सातारा, रायगड, पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस अपेक्षित आहे, तर भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत देखील आज पावसाचा अलर्ट असून मराठवाड्यातील काही भागात आज पाऊस हजेरी लाविल अशी अपेक्षा आहे.
देशभरामध्ये 22 राज्यांना वादळाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने केवळ महाराष्ट्रापुरता हवामान अंदाज वर्तवला असून देशातील अनेक राज्यात पावसाचा मोठा हाहाकार सुरू आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळत झाल असून गुजरात आणि आसाम मध्ये तर परिस्थिती अत्यंत भयंकर बनली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी थेट लष्करांची मदत घ्यावी लागत आहे. या पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने तब्बल 22 राज्यांना तीव्र वादळाचा इशारा दिला आहे. या भागात 530 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्यासोबत जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पुढची परिस्थिती काय?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांमध्ये देशभरातील पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील दोन दिवस कर्नाटकचा किनारा भाग आणि दक्षिण अंतर्गत भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये राज्यात तुफान पाऊस झाला, आणि ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात अतिवृष्टीचा मोठा धोका
सध्या विदर्भामध्ये अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या पाच जिल्ह्यांना मात्र पावसाने मोठा तडाका दिला आहे. मागील दोन दिवसांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी जन जीवन विस्कळीत झाले असून अनेक जणांचे नुकसान देखील झालेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी पाच जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील भिंत कोसळून एक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचा अंदाज
सध्या राज्यभर पावसाचा धुमाकूळ सुरू असताना नागरिकांनी काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे खूप गरजेचे आहे नागरिकांनी नदी नाल्यांजवळ जाण टाळावं, जुन्या व कुंकू व भिंती किंवा पडक्या घराजवळ जाणे टाळावे. पुराच्या पाण्यात वाहन किंवा पायी प्रवास करणे असे धाडसी निर्णय घेऊ नये. वादळीवारांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमी वरती पुढील पंधरा तास शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळावा.
( टिप: वरील माहिती भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजावर आणि स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक माहितीवर आधारित आहे. अद्यावत माहितीसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)