मकर संक्रांतीनिमित्त महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार का? मुख्यमंत्री यांनी एका शब्दात विषय संपवला

0
Maharashtra Breaking News

Maharashtra Breaking News

Ladki Bahin Yojana News: राज्यातील लाखो महिलांच्या नजरा सध्या एकाच प्रश्नाकडे लागल्या आहेत  मकरसंक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3000 रुपये खात्यात जमा होणार का? महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. विरोधकांकडून आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला जात असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण विषयावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. Ladki Bahin Yojana News

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मकरसंक्रांतीला देऊ नये, अशी मागणी करत काँग्रेस पक्षाने थेट राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले आहे. आमचा योजनेला विरोध नाही, मात्र महापालिका निवडणुका होईपर्यंत निधीचे वितरण थांबवावे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. 14 जानेवारीपूर्वी पैसे येणार की नाही, हा प्रश्न घराघरात चर्चेत होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत एकप्रकारे सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लाडकी बहीण योजना ही सुरु असलेली योजना आहे. निवडणूक आचारसंहितेत स्पष्ट म्हटले आहे की, सुरु असलेली कोणतीही योजना थांबवता येत नाही. कोणी कितीही पत्र लिहिली, कितीही आक्षेप घेतले, तरी लाडकी बहीण योजना थांबणार नाही. महिलांना पैसे मिळणारच असे ठाम शब्दांत फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर स्पष्ट संकेत मिळत आहेत की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता रोखला जाणार नाही. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मकरसंक्रांतीच्या आसपास जमा होणार असल्याचे संकेत याआधीच मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते.

राजकीय वाद, पत्रव्यवहार आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत थांबवली जाणार नाही, असा संदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आता लाभार्थी महिलांमध्ये काहीसा दिलासा मिळालेला दिसत आहे. महापालिका निवडणुकीआधीच महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!