ट्रम्पचा धडाका! भारतातील शेअर बाजार कोसळला, या निर्णयामुळे आता औषध महागणार का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Trump 100% Tariff on Pharma : सध्या शेअर बाजारातून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे जगभरातील औषध कंपन्यांना मोठा झटका बसलेला आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलं की, एक ऑक्टोबर पासून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व महागडी ब्रँडेड आणि पेंटेड औषधांवर तब्बल 100% Tariff म्हणजे दुप्पट कर लावण्यात येणार आहे. जोपर्यंत कंपन्या अमेरिकेत कारखाना उभारायला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणतेही सूट मिळणार नाही. या एका गोष्टीमुळे भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी सकाळी बाजारात अक्षरशः गडगडले. Trump 100% Trump 100% Tariff on Pharma

सन फार्मा या सर्वात मोठ्या कंपनीला सर्वाधिक फटका बसला. शेअर थेट वर्षातील निंचांकी पातळीवर ₹1,547 वर पोहोचला आणि 5% घसरला. बायोकोन जवळपास 3.3% कोसळून ₹344 वर गेला, तर झायडस 2.8% घसरून ₹990 वर आलेला आहे. डॉ. रेड्डीज, लुपिन, सील्पा, ऑरोबिंदो अशा दिग्गज कंपन्यांनी 2-2, 5% खाली घसरल. टोरेंट फार्म सर्वात कमी म्हणजे 1.5% खाली आला. एकंदर पाहता सकाळी 9.30 वाजता निफ्टी फार्मा इंडेक्स तब्बल 2.5% ने खाली घसरला.

ही घसरण नेमकी का झाली?

तर ट्रम्प यांच्या घोषणामुळे भारतीय औषध कंपन्यांचा अमेरिकेतील प्रचंड मोठा व्यवसाय डगमगू शकतो. भारतातील सन फार्मा, सीपला, डॉ. रेड्डीज, लूपिन, झायडस, ऑरोबीदो यांचा मोठा हिस्सा अमेरिकेत निर्यात होणाऱ्या औषधांवर अवलंबून आहे. अचानक जर 100% कर लावला, तर ते औषधाची किंमत अमेरिकेत दुप्पट होईल आणि तिथे त्याची विक्री कमी होऊ शकते.

मजेशीर म्हणजे ट्रम्प यांनी एका अटीसह सवलत ही दिली आहे. ज्या कंपनीने अमेरिकेत प्रत्यक्ष कारखाना उभारायला सुरुवात केली आहे, त्यांना हा कर लागू होणार नाही. म्हणजेच “IS BUILDING” म्हणजे जमिनीवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे, कसं दाखवलं तर त्यांना वाचता येईल.

या सगळ्याचा थेट परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवर होताना दिसत आहे. अनेकांनी शेअर विक्री सुरुवात केली असून, औषध कंपन्यांच्या भावांमध्ये मोठी घसरण दिसत आहे. लोकांचा प्रश्न असा आहे की, जर भारतीय कंपन्यांना अमेरिकेत इतका कर द्यावा लागला तर भविष्यात औषध महागणार का? तर सर्दी खोकल्याचे औषध सुद्धा लोकांना परडवत नाही, अशावेळी मोठे कंपन्यांना दबावाखाली आल्यास त्याचा फटका ग्राहकांनाही बसू शकतो.

सध्यातरी बाजारात प्रचंड अनिश्चित आहे. भारतीय औषध कंपन्या पुढे काय निर्णय घेतात, अमेरिकेत गुंतवणूक करतात की इथल्या किमती वाढवतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. पण एवढं मात्र नक्की की, ट्रम्प यांच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात भीतीच सावट पसरला आहे.

हे पण वाचा | बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल

Leave a Comment

error: Content is protected !!