IMD WEATHER NEWS : राज्यातील या 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा? हवामान खात्याने दिला नवीन अंदाज

0
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD WEATHER NEWS | महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे, अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने (IMD) चिंताजनक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आधीच त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हीसकावून घेतलेला आहे. त्यातच पुन्हा हा हवामान अंदाज शेतातील पूर्ण पीक वाया लावणार अशी भीती उपस्थित झालेले. काल मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पुर आले. तर काही ठिकाणी शेतात पाणी शिरले, तर काही ठिकाणी गावात यामुळे अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत. IMD WEATHER NEWS

याच पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा अंदाज वरदवलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तास राज्यातील अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कारण महाराष्ट्रातील तब्बल 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमी वरती मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण राज्य या पावसाच्या विळख्यात येणार आहे.

मराठवाड्यात नांदेड वगळता इतर सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विदर्भात तर गडचिरोली, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर या भागात देखील मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा मोठा तडका बसू शकतो.

या पावसाच्या फटक्यामुळे अनेक शहर मध्ये आणि गावांमध्ये पाणी शिरले आहे. कष्टाने पिकवलेलं कापूस, सोयाबीन, मका, पाण्याखाली जाऊ नये अशी शेतकरी प्रार्थना करत आहेत परंतु अनेक शेतकऱ्यांनी केलेले कष्ट वाया जात आहे. काही ठिकाणी तर जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होत आहे. शेतकऱ्यांचे मन आता पूर्णपणे विचलित झालेल आहे. देवा, आता तरी पाऊस थांबव असं म्हणत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेत.

तसेच सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचे आव्हान करण्यात आलेले आहे. गरज असल्यास घरा बाहेर पडा नदी नाल्याजवळ जाऊ नका, असं वारंवार सांगितलं जातय. पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की अनेक ठिकाणी लोक अडकून पडले आहेत, यामुळे सध्या महाराष्ट्रातील पावसाचे सावट अधिकच बिकट होत चाललेल आहे. पुढील 24 तास राज्यासाठी डोक्याचे ठरू शकतात असा अंदाज बांधला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!