देवेंद्र फडणवीस यांची, राज ठाकरे यांच्या विषयी खास पोस्ट! राजकीय हालचालींना वेग

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Devendra Fadnavis on Raj Thackeray : महाराष्ट्रात ((Power in Maharashtra)सत्तेच्या गणितात नवे समीकरण तयार होतंय का? निवडणुकांची चाहूल लागताच पुन्हा एकदा राजकारणाच्या पटलावर महत्त्वाचे हालचाली सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात नुकतीच झालेली गुप्त भेट आणि त्यानंतर आलेली खास सोशल मीडिया पोस्ट हे सर्व काही राजकीय संकेत देत आहेत.

गुरुवारी सायंकाळी, मुंबईत एका गुप्त ठिकाणी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास दीड तास बंद दरवाजाआड चर्चा झाली. ही चर्चा काय होती, त्याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत फडणवीस यांनी ‘एक्स’ (म्हणजे पूर्वीचा ट्विटर) वर राज ठाकरेंचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या “मनःपूर्वक शुभेच्छा” दिल्या. एवढंच नव्हे, या पोस्टमध्ये वापरलेली खास भाषाही राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा निर्माण करतेय. Devendra Fadnavis on Raj Thackeray

‘भाऊ उद्धव की मैत्री फडणवीसांशी?’

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे चुलत भाऊ. दोघांची शिवसेनेपासून वेगळी झालेली राजकीय वाटचाल राज्यात नेहमी चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण फडणवीस-राज ठाकरे भेट आणि त्यानंतर आलेल्या खास पोस्टमुळे आता मनसे भाजपच्या जवळ जातेय का, हा नवा प्रश्न उपस्थित होतोय.

या सगळ्यात आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे राज ठाकरे यांची वाढदिवसावर घेतलेली भूमिका. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलंय की, “मी 14 जूनला मुंबईबाहेर सहकुटुंब जात आहे. त्यामुळे कोणतेही राजकीय अर्थ लावू नका.” पण नेमकं याच वेळी फडणवीसांचा जाहीर शुभेच्छा संदेश? हा केवळ औपचारिक सन्मान होता की भविष्यातल्या युतीचा संकेत?

भाजपचा नवा डाव?

भाजपसाठी मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवणं प्रतिष्ठेचं बनलं आहे. ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप यांच्यात अंतर्गत संघर्ष असतानाच राज ठाकरे यांच्यासारख्या प्रभावी नेत्याला आपल्या बाजूला खेचणं हा भाजपचा शहाणपणाचा डाव मानला जातोय. राज ठाकरे यांच्या भाषणशैलीला जनमानसात चांगला प्रतिसाद मिळतो, त्यांचा मुंबईत ठसा आहे. त्यामुळे अशा गुप्त भेटी आणि सोशल मीडियावरून दिलेले सिग्नल यामागे काहीतरी मोठं चाललंय, असंच चित्र आहे.

राज ठाकरेंच्या शांततेतही राजकारण…

राज ठाकरे सध्या कोणत्याही थेट राजकीय स्टँडशिवाय शांत आहेत. पण त्यांच्या प्रत्येक कृतीकडे राज्याचं राजकीय वर्तुळ बारकाईने बघतंय. सध्या त्यांनी पक्षनेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या दिवशी न भेटण्याचं आवाहन केलं असलं, तरी “मी बाहेर जात आहे पण त्यामागे काही कारण नाही” हे म्हणणंही अनेक शक्यतांना जागा देतं.

राजकारणात काहीही अशक्य नाही…

सध्या जिथे एकेकाळचे विरोधक हात मिळवत आहेत, तिथे राज ठाकरे आणि भाजपची जवळीक होणं ही फार दूरची गोष्ट नाही. ‘राजकारणात कायमस्वरूपी शत्रू नसतात’ हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave a Comment