Government Scheme For Women: आपले सरकार नेहमीच गोरगरीब नागरिकांसाठी वेगवेगळे योजना राबवत असते. सध्या दिल्लीचा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळाले आहे. दिल्ली विधानसभा मध्ये जवळपास 27 वर्षानंतर भाजप सत्ता स्थापन करणार आहे. भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप सरकार दिल्लीतील अनेक योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करणार आहे.
दिल्लीतील महिलांना आता लवकरच 2500 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी आम आदमी पार्टीचे सरकार महिलांना दरमहा 1000 रुपये देत होते. मात्र भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या जाहीरनाम्यामध्ये आमचे सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना दरमहा 2500 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच महिलांना 2500 रुपये दरमहा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचे आहे; जाणून घ्या सविस्तर माहिती
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर ही महिला सन्माननीय योजना बंद होईल. भाजप सरकार महिलांसाठी नवीन योजना सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील घोषणा केली होती. दिल्लीतील महिलांसाठी नवीन योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपया ऐवजी 2500 रुपये दिले जाणार आहेत. ही योजना कधीपासून लागू होणार असा प्रश्न स्थानिक महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापासून महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय महिला दिवशी महिलांना 2500 रुपये देण्यास सुरुवात केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या निमित्त महिलांना पैसे मिळू शकतात. Government Scheme For Women
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 9,000 रुपये; नेमका काय आहे निर्णय?
दिल्लीमध्ये भाजपचे सरकार बहुमताने आले आहे. भाजपने अजून सत्ता स्थापन केले नाही. लवकरच भाजप आपली सत्ता स्थापन करणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांच्या या योजनेबाबत अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत देखील माहिती दिली जाणार आहे. सध्या या योजनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या योजनेची अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार? या योजनेचे नियम काय असणार? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असणार? या सर्व बाबी लवकरच समोर येतील.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
I am very interested in this apportunity and inform me about the mashroom business planning and loan facility.