Weather forecast : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जशी की आपण बघतो की राज्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलत आहे. यामुळे हे सध्याचे हवामान शेतकऱ्यासाठी चिंता वाढू लागलेले आहे.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने सुरुवात झाली. तेव्हापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस राज्यात थैमान घालत आहे. अवकाळी पावसाने आणि गेल्या महिन्यात काही भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे अक्षरशः तोंडचे पाणी पडलेले आहे.
अगदी तळहाताच्या फोडा सारखे जपलेल्या शेत पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. अशा अनेक शेत पिकांचे मोठे प्रमाणामध्ये नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे काय पावसाने आणि ढगाळ हवामानाचे सावट अजूनही राज्यावर कायमच आहे.
भारतीय हवामान विभागाने तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाच ते सहा डिसेंबर पर्यंत ढगाळ हा माझ्या शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे.
मुंबई संपूर्ण कोकनात मात्र, अवकाळी पाऊस थांबणार आहे. आणि त्या ठिकाणी स्वच्छ हवामान पाहायला मिळेल मध्ये महाराष्ट्र आणि खानदेश मधील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचे वातावरण निवळनार आहे. आणि त्या ठिकाणी देखील स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
मात्र मराठवाड्यात चार आणि पाच डिसेंबर रोजी ढगाळ वातावरण आणि तुरळ ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता राहणार आहे. या भागात सहा डिसेंबर पासून पावसाची उघड दीप पाहायला मिळणार असून, स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल असा अंदाज आहे.
विदर्भ विभागात देखील मराठवाडा प्रमाणेच तीन चार आणि पाच डिसेंबर ढगाळ हवामान काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
सहा डिसेंबर पासून मात्र विदर्भात देखील हवामान खोडे राहणार. आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवणारा असा अंदाज आहे. यामुळे अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशा आशावाद व्यक्त होत आहे.
सहा डिसेंबर पासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडा राहणार असल्याने आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडणार असल्याने हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरेल आणि पिकांची चांगली सुंदर वाढ होईल असे मत आता व्यक्त होऊ लागलेले आहे.