राज्यात या ठिकाणी आज पासून सुरू होणार अवकाळी पाऊस? पहा काय आहे हवामान खात्याचा अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather 10 days: नमस्कार मित्रांनो, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यात काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्या भागात पश्चिम चक्रवादळाचा जोर कायम आहे.

मात्र महाराष्ट्रात तापमान वाढीस सुरुवात झाली आहे दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तामिळनाडू किनारपट्टी ते मराठवाडा आणि विदर्भावर हा पट्टा सक्रिय आहे. यातही विदर्भात पावसाचा जास्त जोर राहण्याचा अंदाज आहे. येथे 9 ते 14 तारखेपर्यंत असा पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडात सह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच या भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकते असेही अंदाज वर्तवला आहे. उद्याही या दोन्ही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाचा पावसाचा अंदाज आहे तर नगर जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे.

रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलका पाऊस पडेल. तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस हलक्या सरी पडतील. धुळे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. नाशिक जिल्ह्यात शनिवारी रविवारी आणि सोमवारी तर पुणे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी तर कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. Weather 10 days

सातारा आणि सांगली जिल्ह्यात काय भागात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. जालना धाराशिव अमरावती बीड जिल्ह्यात आज तर बुलढाणा अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात हलक्या सरी पडतील. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पहा कुठे पडणार पाऊस? कुठे पडणार?

  • राज्यात मध्य महाराष्ट्रात 10 ते 11 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • मराठवाड्यामध्ये 10 ते 11 फेब्रुवारी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
  • विदर्भात 10 ते 14 फेब्रुवारी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:- काळ्या सोयाबीन बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का ? किती असतो भाव, वाचा सविस्तर माहिती

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment