Truck And Bus Driver Protest Again Hit And Tun Law :सरकारने ट्रक ड्रायव्हर साठी नवीन कायदा लागू केला आहे. या नवीन कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.
या नवीन कायद्याविरुद्ध वाहन चालकांनी तीव्र संतप्त व्यक्त केली आहे. व आंदोलन करण्यात इशारा दिला आहे. वाहन चालकावर अन्याय होत आहे व हा नवीन मोटर वाहन कायदा रद्द करावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र वाहनचालकांची आहे.
आता दुचाकी ट्रॅक्टर चालवण्यास भीती वाटणारा हा नवीन कायदा सरकारने आणला आहे. आधीच्या कायद्यात वाहन चालकाकडून अपघात झाला तर एक किंवा दोन वर्षाची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड होता. पण आता या कायद्यात बदल दहा वर्षाची शिक्षा व सात ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक चालकांच्या संपामुळे पेट्रोल डिझेल तुटवडा होण्याची शक्यता :
सरकारच्या नवीन वाहन कायद्यामुळे इंधन टँकर चालकांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात इंधन टँकर चालक सहभागी झाले आहेत. व राज्यामध्ये सोमवारपासून इंधनपुरवठा हा टप्पा आहे. ज्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंप बंद करावे लागले आहे. जर संपा लवकर मार्गी लागला नाही तर, इंधनचा पुरवठा न झाल्यामुळे मोठी टंचाई निर्माण होणार आहे.