Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा, नवीन अंदाज काय पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Update : राज्याच्या बदलत्या वातावरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने (imd) नुकताच एक हवामान अंदाज सर्वांना सुचित केलेला आहे. हा बदलता हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. खरे तर पावसाने राज्यातून अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता भारतीय हवामान खात्याचा अंदाज नक्कीच शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार का? तसेच पुढे हवामान खात्याने आणखी काय अपडेट दिली हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी हा सविस्तर हवामान अंदाज जाणून घ्या. IMD Weather Update

सध्या आपण राज्याचे हवामान बदल पाहत आहोत. गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. परंतु उद्या 14 ऑगस्ट रोजी ही स्थिती कायम राहणार अशी स्थिती भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण घाटमाथ्यावरती काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील आणि सातारा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता आहे.

आज भारतीय हवामान खात्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि मुंबईत मात्र तुलनेने हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच घाटमाथ्यावरती अधिकजोर राहण्याची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवरती पुणे, कोल्हापूर या घाटमाथ्यावरती देखील काही ठिकाणी मुसळधार तर साताऱ्याच्या घाट माथ्यावरती ही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात उर्वरित सपाट भागात मात्र हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास छत्रपती संभाजीनगर इथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर परभणी, बीड, हिंगोली आणि धाराशिव मध्ये हलका पाऊस पडू शकतो. नांदेड, लातूर मध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मराठवाड्यातील एकही जिल्ह्यासाठी कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

विदर्भात परिस्थिती काय ?

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात मात्र परिस्थिती आणखी गंभीर असून इथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे विशेष लक्ष देऊ योग्यती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

( टिप: वरील माहिती हवामान विभागाच्या अंदाजावर आधारित आहे.).

हे पण वाचा : Panjab Dakh Live: पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज; राज्यातील या भागात होणार गारपीट

Leave a Comment

error: Content is protected !!