महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्जमाफी योजना राबवली जाणार; फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari karj mafi Yojana | पिक कर्ज घेतलेला शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्यंतरी भाजप शिवसेनेच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना राबवली गेली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक वेळेस अशा योजना राबवल्या जातात अशीच एक योजना भाजप शिवसेना युतीच्या काळामध्ये राबवली गेली होती.

महायुतीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांची दीड लाख रुपये पर्यंत च कर्जमाफी केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला होता.

ही योजना त्यावेळी महाऑनलाईन या portal द्वारे सुरू केली गेली होती. परंतु तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना अंतर्गत पात्र असलेल्या 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती.

विशेष बाब म्हणजे शेतकरी बांधव शेतकरी कर्जमुक्त योजनेमध्ये पात्र ठरल्याने त्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळालं नाही तसेच महाविकास आघाडीच्या सरकारने देखील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना अंतर्गत देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

यामुळे सदरील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गांमधून सातत्याने केली जात होती आता ही मागणी लवकरच पूर्ण होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

महाआयटी महाऑनलाईनचे अधिकारी वित्त विभागाचे सचिव सहकारी विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारी उपस्थिती या शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात याचा मध्ये महत्त्वाची बैठकी घेणार आहेत. .

त्यामुळे राज्यातील सहा लाख 55 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी या माध्यमातून करण्यात येणार आहेत जे शेतकरी 2017 मध्ये या कर्जमाफीतून वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांना यावेळेस शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी मिळणार आहे.

6 thoughts on “महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्जमाफी योजना राबवली जाणार; फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार”

Leave a Comment

error: Content is protected !!