School time change in Maharashtra : आपण पाहतो की विद्यार्थी ये भारताचे भविष्य आहे, व यासाठी सरकार अनेक योजना विद्यार्थ्यांना देत असतात, व आता यानंतर महाराष्ट्रात प्राथमिक शाळा ज्यावेळी मध्ये बदल करायचे आहे यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केल्यावर हा विषय चर्चेला घेण्यात आला. व आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी याबाबतची घोषणा देखील केली आहे.
महाराष्ट्रात अनेक वर्षापासून शाळा ही सकाळच्या सत्रा मध्ये भरते तर , माध्यमिक शाळा ही दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहे. पण आता ही परंपरा सोडून द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी शाळेच्या वेळ बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही यामुळे लहान मुलांच्या शाळेची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती येथे शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा शालेय मंत्री दीपक केसकर यांनी केली.
काय असणार वेळ ?
तर महाराष्ट्राचे शैक्षणिक मंत्री दीपक केसकर यांनी याबाबतची सूचनादेश सांगितले की माध्यमिक शाळा मधील विद्यार्थ्यांचे वय बारा वर्षाच्या पुढे तर प्राथमिक शाळा मधील मुलांची वय तीन ते दहा वर्षे असते. या कारणाने प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात अशी मागणी शारीरिक शिक्षण मंत्री यांनी राज्यपालांकड केली आहे.
आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून दुसरीपर्यंतची प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजता होणार आहे परंतु इतर वर्गाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे असे दीपक केसकर यांनी स्पष्ट केले आहे.
समितीची होणार स्थापना :
विद्यार्थ्यांना अनेक अडचणी होत असतात त्यामुळे आता शैक्षणिक मंत्री दीपक केसकर यांनी समिती नोंदवायचा निर्णय घेतला आहे ,व या समितीमध्ये मन वैज्ञानिक बालरोग तज्ञ यांचाही समावेश असणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे, व राज्यपालांनी अलीकडे सूचना दिली आहे .आता याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे दीपक केसकर यांनी स्पष्ट केले की, राज्यपालाच्या या मताशी सरकार सहमत आहे व एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ञाची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये मनविज्ञानिक, बालरोग तज्ञ, अशा अनेक तज्ञांची समावेश होणार आहे.