Sarpanch Salary: महाराष्ट्रामध्ये गावाच्या सरपंचाला किती मिळतो पगार ? आहे का तुम्हाला माहिती? वाचा एटु झेड माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarpanch Salary : ग्रामीण भागाच्या विकास होण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीचे महत्व अनन्यसाधारण असते, हे आपल्याला माहितचं आहे. ग्रामपंचायतीचे प्रमुख पद जर म्हंटले तर राजकीय दृष्टिकोनातून सरपंच या पदाला देखील खूप महत्त्व आहे.

सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो आता सरपंचाची निवड ही थेट जनतेतूनच होते.तीन जुलै 2017 रोजी मंत्रिमंडळाने जो काही निर्णय घेतला, त्या निर्णयाने आता सरपंचाची थेट निवड जनतेच्या माध्यमातून केली जाते.

त्यामुळे बरेच व्यक्ती सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावत असतात. व त्यासाठी वाटेलं तो खर्च करण्याची तयारी देखील ठेवतातं. या अनुषंगाने आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो. की सरपंच पदासाठी जी काही चळवळ केली जाते. त्यामुळे सरपंच असलेल्या व्यक्तीला नेमका पगार हा शासनाकडून किती मिळतो. याबाबतची माहिती आपण खालील पाहूया.

अगोदर सरपंचांना किती पगार मिळायचा ?

सरपंचाच्या मानधनांमध्ये वाढ करण्यासंदर्भात आणि उपसरपंच यांना मानधन सुरू करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 30 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला होता. परंतु त्या आधी सरपंचाने मानधन किती मिळवायचे. व गावच्या लोकसंख्या यांच्या प्रमाणामध्ये विभागलेले असते.

1-शून्य ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत-अगोदरच या लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पगाराची प्रत्येक महिन्याला मिळणारी रक्कम 1000 रुपये होती. यामध्ये शासनाकडून 75 टक्के तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वतःच्या निधीमधुन देत असते.

2-200 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन- लोकसंख्येच्या प्रमाणातं असलेल्या ग्रामपंचायत सरपंचाला दर महिन्याला पंधराशे रुपये एवढा पगारं मिळत असतो.

3- 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मिळणारा पगार- लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असलेल्यां ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पगार हा प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांनी होतो.

30 जुलै 2019 रोजी शासन निर्णयानुसार सरपंचाच्या पगारात झाली वाढ.

30 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र च्या सरपंचाच्या पगारात वाढ करण्यासंदर्भात आणि उपसरपंच यांना पगार सुरू करण्यासाठीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच अर्थमंत्री म्हणजे, अजित पवार यांनी 2019-20 चा अर्थसंकल्प सादर करताना, सरपंचाच्या पगारात वाढ केली. व उपसरपंच यांना देखील पगार सुरू केले. या नवीन शासन निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच यांना पुढील प्रमाणे मानधन मिळते.

1-शून्य ते 2000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच व उपपंचाचे पगार-ग्रामपंचायतच्या सरपंचांना, मानधनाचे दर महिन्याला मिळणारी रक्कम, आता ही तीन हजार रुपये आहे. तर उपसरपंचाला मिळणारी पगाराची रक्कम दर महिन्याला एक हजार रुपये आहे. त्यामध्ये देखील शासनाकडून 75 टक्के उर्वरित पगार ग्रामपंचायत स्वनिधीतुन देतो.

2-2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती- या ग्रामपंचायतच्या सरपंचांना दर महिन्याला 4 हजार रुपये इतका पगार मिळतो. तर उपसरपंचाला 1500 रुपये मिळतो.

3-8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती – या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना, दर महिन्याला पाच हजार रुपये इतका पगार मिळतो .तर उपसरपंचाला दोन हजार रुपये इतका पगार मिळतो.

Leave a Comment

error: Content is protected !!