Punjab Duck Weather Forecast: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कधी थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील पडला आहे. या दरम्यान 28 फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत ह्या चार दिवसात खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर अशा दहा जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा तुरळ ठिकाणी गडगाठीसह विजाचा सुसाट व वादळ वारा देखील होण्याची शक्यता आहे.
या दहा जिल्ह्यात किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. या दमनच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर अशा पाच जिल्ह्यात व लगतच्या परिसरात आज पासून एक मार्चपर्यंत असे तीन दिवस गारपीटीची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता
मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यात आज 28 फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत असे चार दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी वादळ वाऱ्यासोबत विजाचा सुसाट व किरकोळ अवकाळी पाऊस देखील होणार आहे. अशी शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवस मराठवाड्यात गारपीटीची शक्यता जाणवत असल्याचे पंजाबराव डख म्हणाले.
कोकण व विदर्भात कसे राहणार वातावरण? | Punjab Duck Weather Forecast
विदर्भात सर्व अकरा जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार म्हणजेच एक आणि दोन तारखेला अशा दोन दिवस व ढगाळ वातावरणात तुरळ ठिकाणी सुसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ भागात अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे पंजाबराव म्हणाले. त्याचबरोबर मुंबई सह कोकणातील सात जिल्ह्यात आज व बुधवारी व गुरुवारी म्हणजे 28 व 29 फेब्रुवारी असे दोन दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळ ठिकाणी गडगडाटीसह विजा सोसायटीच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे. विदर्भ व कोकणात गारपीटीची शक्यता जाणवत नसल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली.
राज्यातील शेतकरी चिंतेत
दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत दिसत आहे. कारण गेल्या दोन दिवसात राज्यात शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. विशेषता कापणीसाठी तयार झालेल्या उभ्या पिकाची नासाड होत आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता मात्र नुकसान टाळता आलेली नाही. पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघर्जनासह पावसाची शक्यता आयएमडी ने वर्तवली आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पाऊस येण्याआधीच उपयोजना करणे गरजेचे आहे.
हे पण वाचा:- कांद्याच्या दरात मोठे बदल..! राज्यातील या बाजार समितीत मिळत आहे कांद्याला सर्वोच्च भाव
One thought on “2 मार्चपर्यंत या 10 जिल्ह्यात पावसाची शक्यता, तर या भागात होणार गारपीट, पहा सविस्तर माहिती (Punjab Duck Weather Forecast)”