Kisan Credit Card: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा तीन लाख रुपयावरून वाढून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. तसेच देशातील लाखो शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतील. किसान क्रेडिट कार्डसोबत बचत खात्याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना हे कार्ड पंधरा दिवसाच्या आत मिळते किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा जाणून घेऊया.
किसान क्रेडिट कार्ड चे फायदे
किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदरावर तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळत होते मात्र आता एक फेब्रुवारी 2025 पासून यात वाढ होऊन पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते. जर एखादा शेतकरी वेळेवर कर्ज फेडू शकला नाही तर त्याला तीन टक्के अनुदान दिले जाते. Kisan Credit Card
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकतात. यामध्ये ऑफलाइन अर्ज करू शकतात किंवा ऑनलाईन अर्ज देखील तुम्ही करू शकतात.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत
किसान क्रेडिट कार्ड योजनेला ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. किसान क्रेडिट कार्ड साठी बँका पंचायत किंवा जिल्हा प्रशासन एकत्र काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड साठी सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा लागेल. बँकेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्याकडून किसान क्रेडिट कार्ड अर्ज घ्यावा लागेल. यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून बँकेत अर्ज जमा करावा लागेल. दरम्यान शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत कार्ड मिळून जाईल.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्या आवडत्या बँकेच्या वेबसाईटवर जा.
- होम पेजवर किसान क्रेडिट कार्डचे ऑप्शन दिसेल.
- येथे अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल.
- येथे तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल आणि तुम्हाला तुमचा संदर्भ क्रमांक मिळेल.
- जर तुम्ही या कार्डासाठी पात्र असाल तर बँक तुमच्याशी पाच दिवसाच्या संपर्क साधेल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मतदान ओळखपत्र
- वाहन चालवण्याचा परवाना
- शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा