Pradhan Mantri Yojana | देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. एक फेब्रुवारी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पनामध्ये मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊ शकते.
या अर्थसंकल्पनामध्ये गरीब शेतकरी तरुण आणि महिलांसाठी मोठ्या गोष्टीची शक्यता आहे तर प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाईल असे बोलले जात आहे.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमधून वर्षाखाली शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. हीच रक्कम आता शेवटच्या अर्थसंकल्पनामध्ये वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. ही रक्कम दोन हजार रुपयांनी वाढवली जाऊ शकते ज्यामुळे सध्या मिळणाऱ्या सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीवरून ही रक्कम आठ हजार रुपये केली जाऊ शकते.
वर्षाला मिळणार आठ हजार रुपये
केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत करते. सिरक्कम चार महिन्यांच्या टप्प्यामध्ये दोन हजार रुपयांमध्ये वितरित केली जाते.
हे हप्ते एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिले जातात तर हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात तसेच जर सरकारकडून वाढीव रकमेवर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना वाढीव दोन हजार रुपये मिळतील म्हणजे एका वर्षाला आठ हजार रुपयांचे आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येतील.