Pradhan Mantri Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना मोदी सरकारने एक जानेवारी 2019 रोजी सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेअंतर्गत सुमारे 11 कोटी शेतकरी लाभार्थी होते. मात्र नंतर काही शेतकरी अपात्र झाले आहेत.
सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही निकष अनिवार्य केले आहेत. त्यामध्ये आधार सिडींग, जमिनीच्या नोंदी आणि KYC अनुपालन याचा समावेश आहे. यामध्ये देशातील एकूण लाभार्थ्याची संख्या सुमारे 8.5 कोटी पात्र शेतकऱ्यापर्यंत कमी झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये 84 लाख शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत पंधरावा हप्ता देण्यात आला होता. यापूर्वी ही योजना चालू झाली तेव्हा राज्यातील सुमारे 1 कोटी 20 लाख शेतकरी लाभार्थी पात्र होते. मात्र नवीन निकषामुळे ही संख्या कालांतराने कमी झाली आहे.
प्रधानमंत्री किसन योजनेचा चौदावा हप्ता वाटप झाला तेव्हा महाराष्ट्र राज्यात फक्त 70 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नानंतर आता लाभार्थ्याची संख्या वाढली आहे. एम किसन योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये असे 3 हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये मिळतात.
हे पण वाचा:- या 10 राशीसाठी आजचा दिवस आहे खास..! वृश्चीक आणि मकर राशीसाठी दिवस चिंताजनक असेल, पहा आजचे राशीभविष्य
Pradhan Mantri Yojana
पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. तेव्हा महाराष्ट्र राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. येत्या काही दिवसात 16 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. सोर्सच्या माहितीनुसार पुढील हप्ता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये वितरित केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी KYC ची अंतिम मुदत 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी जवळपास चार लाख शेतकऱ्यांनी त्यांच्या KYC औपचारिक रित्या पूर्ण केल्या नाहीत.
आत्तापर्यंत राज्यात 86.48 लाख शेतकरी E-KYC मोहिमेनंतर पात्र घोषित करण्यात आले आहेत. पण अजून चार लाख शेतकरी KYC पूर्ण करायचे बाकी आहेत. शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
हे पण वाचा:-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कांद्याच्या भावात झाली मोठी वाढ, पहा आजचा बाजार भाव