Friday

14-03-2025 Vol 19

PM KISAN योजना संबंधित मोठी अपडेट ! या तारखेला जमा होऊ शकतो 16 वा हप्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : देशातील गरीब शेतकऱ्यांना अधिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 15 हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक चार महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. असे, वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. दरम्यान शेतकऱ्यांना 16 हप्ता कधी मिळणार ?याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबतची माहिती आपण पाहूया.

फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार 16 वा हप्ता,

सरकार फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता जारी करण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारने 15 नोव्हेंबर 2023 रोजी योजनेचा 15 हप्ता जारी केला होता. पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व जमीन धारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या 3 सन्मान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6,000 रुपये आर्थिक लाभ दिला जातो.

पीएम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे. जी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शेती आणि संबंधित कामांसाठी तसेच घरगुती गरजा, पूर्ण करण्यासाठी मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. सर्व जमीन धारक शेतकरी कुटुंबे यांच्या नावावर शेती योग्य जमीन आहे.

ते योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात 80 दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनेचा 15 हप्ता जारी केला होता. यापूर्वी सरकारने 14 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 2.62 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे.

सोळाव्या हप्त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

अधिकृत वेबसाईट pmKisan.gov.in ला भेट द्या. नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा, आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आणि कॅपच्या भरा. आता पूर्ण तुमचा तपशील भरा, आणि होय वर क्लिक करा.

पी एम किसान अर्ज फॉर्म 2023 मध्ये विचारलेली माहिती भरा. ती सबमिट करा, आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट द्या.

पात्र शेतकरी त्यांची स्थिती याप्रमाणे तपासून शकतात.
Pm kisan.gov.in ला भेट द्या.
मुखपृष्ठावरील शेतकरी कॉर्नर विभागांतर्गत लाभार्थी स्थिती पर्याय निवडा,
नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा. डेटा मिळवा वर क्लिक करा.
हफ्त्याची स्थिती दिसेल.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *