ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! आज झालेल्या बैठकीत ऊसाच्या दरावर तोडगा निघाला Price increase of sugarcane

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Price increase of sugarcane: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ऊसाच्या दराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. प्रशासन, शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यात आज पार पडलेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरून सुरू झालेला वाद शेवटी मिटला आहे. ऊस दरबाबत प्रश्नावर आज तोडगा काढण्यात आला आहे. प्रशासन व साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यातील आजच्या या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. साखर कारखान्याने बिना कपात 3175 रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे.

त्यामुळे ऊस आंदोलनाला मोठा यश मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून या मुद्द्यावर जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी प्रशासन आणि साखर कारखानदार य यांच्यासोबत बैठक होत होत्या. पण या बैठका निष्कळ होताना दिसत होत्या. अकिराच्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे हा प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे.

हे पण वाचा:-शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ऊसाच्या दरात मोठा बदल, पहा हा साखर कारखाना देत आहे सर्वात जास्त भाव…

Price increase of sugarcane

कोल्हापूरचे फॉर्मुल्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यात ऊसाला दर मिळावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन चालू होते. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सहभागी झाले होते. त्यांच्या नेतृत्वात कारखान्याचा काटा बंद आंदोलन देखील करण्यात आले होते. यानंतर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी दर जाहीर केले मात्र उर्वरित साखर कारखान्यांना दर मान्य असल्याने हे आंदोलन चालूच राहिले. मात्र आज याच्यावर तोडगा काढून उसाचे दर वाढवण्यात आले आहे.

जाणून घ्या दुष्काळी पट्ट्यातील साखर कारखाने किती दर देणार ?

यानंतर प्रशासनाने साखर कारखानदार शेतकरी संघटना यांच्यात बैठक बोलावली होती. दोन बैठकीनंतर आज तोडगा निघाला आहे. कारखानदारांनी 3175 रुपये दर देण्याचा जाहीर केले आहे. दुष्काळी पट्ट्यातील साखर कारखाने 3100 देण्याचे या अगोदरच जाहीर झाले होते. त्यामुळे आंदोलनाला यश मिळाले आहे.

12.5% रिकव्हरीच्या वर आहे त्या सर्व साखर कारखान्यांना विना कपात 3175 रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला शेवटी यश मिळाले आहे. यापुढेही उसाचे काठामारी येथे निल ची लढाई सुरूच राहणार असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले.

हे पण वाचा:- कुसुम सौरपंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर, ज्यांनी अर्ज केला नाही त्यांनाही सौरपंप मिळणार..!

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment