Friday

14-03-2025 Vol 19

सर्वात मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळेस जमा होणार सहा हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Samman Nidhi Installment | राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाच वेळेस राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून सहा हजार रुपये मिळणार आहेत सोळावा हप्ता म्हणजेच उद्या 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी भेट मिळणार आहे.

केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तर नमो शेतकरी निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दुसरा व तिसरा हप्ता मिळणार आहेत.

म्हणजे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपयांचा लाभ जमा होणार आहे. यासाठी राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

त्यासाठी शेतकरी कुटुंबाच्या आधार शेडिंग बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.

यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा खात्यावरती होणार सहा हजार रुपये जमा.

यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्यपाल रमेश बैस, तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,

वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

Rushikesh

One thought on “सर्वात मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळेस जमा होणार सहा हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *