PM Kisan New Registration | शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची कामाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा पीएम किसान योजनेचा लाभ नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पीएम किसन नावाची योजना राबवली जात आहे. ही योजना केंद्र सरकार अंतर्गत 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती.
पी एम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळतो. दरवर्षी शेतकऱ्यांना पीएम किसान योजना अतर्गत सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. सरकारकडून प्रत्येकी चार महिन्यांमध्ये वार्षिक तीन हप्ते प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये प्रमाणे दिले जातात.
तसेच याच धर्तीवर राज्य सरकारने देखील पीएम किसान या योजनेअंतर्गत नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आता शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे मिळून वर्षाकाठी 12 हजार रुपये मिळणार आहेत यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही घरबसल्या देखील सहज अर्ज करू शकता.
या प्रकारे करा अर्ज
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी या बटनावरती क्लिक करा आधार आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि राज्य निवडा
- नोंदणीकृत नंबर वरती आलेला ओटीपी भरा आणि पुढे जा या पर्याय वर क्लिक करा
- नंतर दिलेला सर्व तपशील व्यवस्थित भरा.
- त्यानंतर मोबाईल नंबर वर मिळालेला ओटीपी टाका आणि शेती संबंधित सर्व तपशील कागदपत्रे अपलोड करा.
पीएम किसन योजनेची पात्रता काय
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अल्पभूधारक शेतकरी असणे आवश्यक आहे.
- शेती निगडित कामात गुंतलेल्या कुटुंबा व्यतिरिक्त वैयक्तिक शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा लाभली गेली नाही.