Pik Vima Maharashtra 2023: पिक विमा योजना ही पूर अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थिती मध्य होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावा यासाठी सरकारने पिक विमा योजना सुरू केली आहे तरी या वर्षीपासून सरकारने एक रुपयात पिक विमा भरण्यात येत आहे परंतु सर्व जिल्ह्यात सर्व पिकांना विम्याचे कवच नाही त्यामुळे जिल्ह्यातील ईतर पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन नाही मिळत. यामुळे शेतकरी आता विचलित झाले आहेत. करणारा कोणती पिक घ्यावे व कोणत्या पिकाला विमा लागू होतो या समभ्रमात शेतकरी पडले आहे.
पिक विमा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी असतो असा दावा सरकार नेहमी करत आहे. परंतु या उलट शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचा अधिक दमला होतो असल्याचा दावा झाला आहे पिक विम्या संदर्भात राज्य सरकारकडून नवीन धोरण तयार करण्यात आले असल्याचे तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले होते परंतु यावर्षीपासून राज्यात बीड पॅटर्न लागू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे संचालक राजेंद्र साबळे यांच्याकडून देण्यात आलेली होती.
आणि आता सर्व शेतकऱ्यांना फक्त एक रुपया विमा काढता येणार आहे परंतु या कंपन्याने सर्व जिल्ह्यात सर्व पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात आले नाही. या उलट काय जिल्ह्यात काही पिकांना तर दुसऱ्या जिल्ह्यात काही पिकांना असा वेगवेगळ्या पिकांना विमा देण्यात आल्या आहे यामुळे शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यायचं याचा विचार करावा लागतो.
आता आपण कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकांना विमा लागू झाला आहे. तर भंडारा गोंदिया या दोन जिल्ह्यात कापूस, तूर, मुंग, उडीद, ज्वारी ,भुईमूग ,पिकांना विम्याचे संरक्षण नाही तर गोंदिया वगळता विभागातील इतर जिल्ह्यात सोयाबीन पिकांना विमा लागू आहे ,त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात सोयाबीन, पीक घेतलेले शेतकऱ्यांना विमा कवच मिळणार नाही. तर गडचिरोली जिल्ह्यात सोयाबीन, कापूस ,धान ,पिकाला पिक विम्याची कवच मिळणार आहे. तरी या उलट तुर ,उडीद, मुंग, ज्वारी ,भुईमुंग ,पिकाला विमा कंपनीचे संरक्षण मिळणार नाही.
तर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकाला हेक्टरी किती पिक विमा आला याची माहिती पाहू.
प्रतीक प्रतीक जिल्ह्यात विमा कंपनीने वेगवेगळी मार्ग निश्चित केली आहे जसे की वर्धा मध्ये कापसाला हेक्टरी 52 हजार इतका पिक विमा संरक्षण कवच देण्यात येणार आहे. तर नागपूर मध्ये 57 हजार पाचशे रुपये इतका हेक्टरी असणार आहे व चंद्रपूर मध्ये 55 हजार 750 रुपये इतका . चंद्रपूर मध्ये पन्नास हजार हेक्टरी असणार आहे वर्धा मध्ये 49000 नागपूर मध्ये 50 हजार भंडारा मध्ये 39 हजार 250 तर चंद्रपूर मध्ये 52 हजार 750 इतकी रक्कम शेतकऱ्यांना विमा कंपनी कुण मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाचे सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी दिले आहे.