Soybean News : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाच्या आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांना फोनवर काही महत्त्वाची चर्चा केली त्यांनी सोयाबीन खरेदीसाठी मुदत किमान 15 दिवसांची वाढवण्याची मागणी केली आहे. या मागणी वरती कृषी मंत्री शिवराज चव्हाण काय निर्णय घेतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. Soybean News
खरेदी यंत्रणा प्रभावी करण्याच्या सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सह्याद्री अतिथीग्रहात आज आयोजित आढावा बैठकीत सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. पुढील वर्षापासून नोव्हेंबर मध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी ऑक्टोबर मध्ये तयारी पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी केली. यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
राज्यातील चारही विभागांमध्ये ऍग्रो लॉजिस्टिक हब्स उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच कांदा साठवणुकीसाठी चाळीची संख्या वाढवण्याबाबत त्यांनी सूचना केली. सोयाबीन गर्दीसाठी आवश्यक सुविधा आणि अडथळा मुक्त व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हमी भावा पेक्षा कमी दरात विक्रीचा प्रश्न
राज्यामध्ये काही ठिकाणी हमी भावानुसार सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र, सर्व बाजार समितीमध्ये हे केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना वाहतूक खर्च करावा लागत आहे. वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना 4000 प्रतेक कोणत्या दराने सोयाबीन विकत आहेत.
किसान सभा संघटनेने राज्य व केंद्र सरकारकडे हस्तपेक्ष करून सर्व बाजार समितीमध्ये हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी किमान आधारभूत किमान हजार रुपये प्रति क्विंटल देण्याची घोषणा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना तो दर मिळत नसल्याने किसान सभेने यावरती नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार
मुख्यमंत्री फडवणीस यांच्या पुढाकारामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्याचे अपेक्षा आहे आता केंद्रीय कृषिमंत्री यावर काय निर्णय घेणारे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.