Saturday

15-03-2025 Vol 19

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! नवीन कांद्याची आवक वाढल्याने दर नियंत्रणात इतका मिळत आहे कांद्याला दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market | यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याच्या दरबारात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या बाजारात हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू आहे. या नवीन कांद्याच्या दररोज सरासरी 100 गाड्या बाजारामध्ये येत आहेत.

मागील वर्षी अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादनामध्ये मोठे प्रमाणामध्ये घट झाली होती. त्यामुळे 2023 या वर्षात कांद्याच्या भावाने शंभरी गाठली होती. परिणामी घरांची बजेट बिघडले होते. मात्र यंदा नवीन वर्ष सुरुवातीला कांद्याच्या दरबारात ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला दिसून येत आहे. सध्या बाजारामध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झालेली आहे. बाजारामध्ये या कांद्याच्या दररोज शंभर गाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे कांद्याचे दर ही नियंत्रणात आलेले आहेत.

सध्या राज्यातून पुणे, नाशिक, जुन्नर, मालेगाव, ओतूर या भागातून कांद्याची आवक होत आहे. दररोज शंभर गाड्या येत असल्याने बाजारातील कांद्याची मागणी पूर्ण होत आहे.

विशेष म्हणजे या चालू हंगामात ओला कांदा येत आहे. तो साठवून ठेवण्यासारखा नाही त्यामुळे त्याचे दर नियंत्रणात आहेत. घाऊक बाजारामध्ये दहा ते वीस रुपये किलो ने कांदा विकला जात आहे. आतापर्यंत गाव बाजारामध्ये कांद्याचे दर 30 ते 40 रुपये पर्यंत होते. मात्र नवीन कांद्याचे आगमनामुळे द नियंत्रणात आले आहेत परिणामी दहा ते वीस रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

आतापर्यंत बाजारात या कांद्याची आवक होत राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कांद्याचे दर नियंत्रणात राहणार अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. मार्चनंतर नवीन साठवणीच्या कांद्याचे आवक सुरू होईल त्यामुळे तेव्हा दरात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र दर कांद्याच्या उत्पादनावर अवलंबून राहणार आहे सध्या तरी दर कमी असल्याने आवक समाधानकारक असल्याचे कांद्याने ग्राहकांना दिलासा दिला आहे.

किरकोळ बाजारात तीस रुपये किलो. घाऊक बाजाराच्या दारात घसरण झाल्याने किरकोळ बाजारातही कांदा तीस रुपये किलो पर्यंत आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *