Pension Update Online | आताची सर्वात मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2019 मध्ये सुधारणा केली आहे.
या अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना आता कौटुंबिक पेन्शनसाठी तिच्या पतीला नाम निर्देशित करणे ऐवजी तिच्या मुलाला किंवा मुलीला कौटुंबिक पेशंटसाठी नामनिर्देशित करण्याचा अधिकार दिला गेला आहे.
यासह महिला कर्मचाऱ्यांना किंवा निवृत्तीवेतनधारकांना पती किंवा मुलांचे नामकरण करण्याचा अधिकार आहे.
केंद्रीय नागरिक सेवा पेन्शन नियम 2021 मध्ये सुधारणा करण्याबाबत जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाने सिविल सर्विसेस पेन्शन मध्ये सुधारणा केलेली आहे.
2021 नियम ज्याद्वारे महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांना आता त्यांच्या पात्र मुलाला किंवा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडीदाराला ऐवजी कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याची परवानगी आहे.
सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकांना संबंधित कार्यालय प्रमुखांना लेखी विनंती करावी लागणार आहे.
या आली की विनंती मध्ये कर्मचाऱ्यांना तिच्या पात्र मुलांना/मुलींना तिच्या पती पूर्वी कौटुंबिक निवृत्त वेतन दिले जावे. या प्रक्रिये दरम्यान महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास विनंती पत्रानुसार कुटुंब निवृत्तीवेतन वितरित केले जाणार आहे.
सरकारी कर्मचारी महिला विधवा असेल तर तिच्याकडे दुसरे कोणी नसेल तर अशा परिस्थितीमध्ये पेन्शनचा दावा केला जाणार नाही.
जर विधवा कर्मचारी मुलींना किंवा मानसिक विकाराने ग्रस्त मुलीची पालक असेल तर विधवा जोपर्यंत पालक राहते तोपर्यंत तिला कौटुंबिक पेन्शन दिले जाणार आहे. मूल प्रौढ झाल्यावर आणि कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र ठरल्यानंतर मुलाला पेन्शनचा अधिकार असणार आहे.