Onion Rates | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. कांद्याचे शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पाणी आणले.
आठ डिसेंबर पासून देशभरामध्ये कांदा निर्यात बंदी लागू केल्याने शेतकऱ्याचा कांदा कवडीमोल दरात विकत आहे. कांद्याचे दर किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये प्रति किलोपर्यंत गेले असल्याने दर नियंत्रणा करण्यासाठी कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली.
कांदा निर्यात बंदी केल्यानंतर ठीक ठिकाणी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत आंदोलन आंदोलन केलेआणि मागणी उठण्याची मागणी केली. परंतु अद्याप निर्यात बंदी उठवली नसून येत्या काळात निर्यात बंदी उठेल याचीच शक्यता कमी असल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या पदकांनी सातत्याने देशातील कांद्याची शेती आणि इतरांचा आढावा घेत आहे. त्यात लागवडीची टक्के कमी असल्याने निदर्शनात आल्यानंतर निर्यात बंदी हटवणे शक्य नसल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केले. याच दरम्यान पुढील महिन्यात 15 मार्च रोजी स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती यावेळी दिली.
कांद्यावरील निर्बंध हा विषय आगामी निवडणुकीमध्ये सरकारसाठी अडचणी निर्माण करू शकतो. आणि ही गोष्ट राज्यातील बडा नेत्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात बंदी हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे सरकारकडे साकडे घातले आहे. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याची माहिती अमित शहा यांनी दिल्याचे माहिती सरकारमधील बड्या नेत्यांनी दिली आहे.