Onion Market Price: कांद्याच्या बाजारभावाने शेतकऱ्याचे चांगले डोकेदुखी वाढवले असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाल कांद्याला सरासरी 3000 रुपये पेक्षा अधिक भाव मिळत होता. मात्र किरकोळ बाजारात कांदा भाव वाढताच केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बाजारात कांदा कोसळला. आज पंधरा दिवसानंतर आता कांदा बाजार भाव निम्म्यावर आले असून निम्मेदाराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
दरम्यान आज 28 डिसेंबर रोजी नाशिकच्या लालसगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला तर पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1310 इतका दर मिळाला. म्हणजेच कालच्या बाजारभावापेक्षा आज दोन्ही कांद्याचा बाजारभाव दोनशे ते तीनशे रुपयांनी पुन्हा घसरल्याचे दिसून आले आहे.
लालसगाव बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 5500 क्विंटल एवढी आवक झाली आहे. त्या त्या कांद्याला कमीत कमी 600 रुपये दर मिळाला तर जास्तीत जास्त 1500 रुपये इतका दर मिळाला आहे.
येवला अंदरसुल बाजार समिती लाल कांद्याची 6000 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 300 इतका दर मिळाला तर सरासरी 1350 इतका दर मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची 86 क्विंटल इतकी आवक झाली असून कमीत कमी दर 725 इतका तर सरासरी दर 1310 इतका मिळाला आहे.
हे पण वाचा:-नवीन वर्षे सुरू होताच पावसाचे आगमन, महाराष्ट्र सह भारतात अनेक ठिकाणी पडणार पाऊस.
Onion Market Price
कोल्हापूर बाजार समिती लाल कांद्याची 5370 क्विंटल आवक झाले आहे तर कमीत कमी दर 500 रुपये, व जास्तीत जास्त दर 3000 रुपये तर सरासरी दर एक हजार पाचशे रुपये इतका आहे. अकोला बाजार समितीत कांद्याची 800 क्विंटल आवक झाले आहे. कमीत कमी दर एक हजार रुपये व जास्तीत जास्त दर 2200 रुपये तर सरासरी दर 1800 रुपये इतका मिळाला आहे. छत्रपती संभाजी नगर बाजार समिती १३४० क्विंटल आवक झाले आहे. कमीत कमी दर 250 रुपये व जास्तीत जास्त दर 1700 रुपये तर सरासरी दर 900 रुपये इतका मिळाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट बाजार समिती 11550 क्विंटल झाले आहे. कमीत कमी दर 1500 व जास्तीत जास्त दर 2500 रुपये इतका मिळाला आहे व 2000 रुपये मिळाला आहे. कल्याण बाजार समिती नंबर एकच्या कांद्याची 4 क्विंटल एवढी आवक झाली आहे. कमीत कमी दर 1700 व जास्तीत जास्त 2600 तर सरासरी दर 2100 रुपये एवढा मिळाला आहे.
पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची 11470 क्विंटल आवक झाले आहे. कमीत कमी दर 800 रुपये व जास्तीत जास्त 3000 रुपये तर सरासरी दर 1900 रुपये इतका आहे. कामठी बाजार समितीत लोकल कांद्याची 5 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 2500 रुपये व जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये तर सरासरी 3000 रुपये इतका दर मिळाला आहे.
हे पण वाचा :- येत्या 10 दिवसात कापसाच्या बाजारभावात होणार मोठी वाढ..! जानेवारी महिन्यात कापसाचे दर 10 हजाराच्या पार जाण्याचे संकेत