Monsoon Update 2023 : यंदाचा ऑगस्ट 122 वर्षातील सर्वात कोरडा जाणार ? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update 2023 : सध्या या महिन्यात पावसाने चांगली चिंता वाढवलेली आहे तीन-चार आठवडे होत आले तरी अनेक राज्यांमध्ये पाऊस नाही. ( Maharashtra Rain) जर असंच राहिलं तर यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 122 वर्षातील सर्वात कमी पावसाचा म्हणजे कोरडा ठरू शकतो असं हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ऑगस्टमध्ये महिन्यात पावसाने बहुतांश राज्यामध्ये उघडीप दिली आहे. राज्याच्या जवळपास 800 ते 700 मंडळांमध्ये पंधरा ते सोळा दिवसांपासून पाऊस पडला नाही. महाराष्ट्र मध्ये सुद्धा एक ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या काळात सरासरी पेक्षा ६८ टक्के कमी पाऊस पडला आहे ऑगस्टमध्ये केवळ महाराष्ट्रात नाहीतर शेजारच्या राज्यांमध्येही कमी पाऊस झाला आहे कर्नाटकात सरासरी 78 टक्के कमी पाऊस पडला आहे तेलंगणात 82 टक्के पाऊस झाला आहे. गुजरात मध्ये सरासरीपेक्षा 90 टक्के कमी पाऊस पडला आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या तारखेपर्यंत करता येणार पिक विमा योजनेची नोंदणी

दक्षिणेत केरळमध्ये 99% आणि आंध्रामध्ये साठ टक्के पाऊस झाला आहे राजस्थानमध्ये सरासरी 91 टक्के पाऊस पडला आहे पंजाबमध्येही 64 टक्के आणि हरणात 65 टक्के पाऊस झाला आहे या सर्व राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तर मध्यप्रदेशात सरासरी 30 टक्के पाऊस पडला आहे व छत्तीसगडमध्ये 27 टक्के आणि उत्तर प्रदेशात बत्तीस टक्के पाऊस झाला आहे हे सर्व राज्य खरिपाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या राज्यामध्ये पेरणीच्या वेळेस पावसाने खूप काम दिला आहे.

हे पण वाचा:- हा अहवाल सादर करा तरच मिळेल कांदा अनुदान कांदा अनुदाना वितरण बाबत शासनाचा महत्त्वाचा निर्णय पहा संपूर्ण माहिती

2023 च्या ऑगस्ट महिन्यात उस्मान कमी असल्यामुळे किमान पावसाचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे हवामान विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी या संबंधात माहिती दिली आहे व ही माहिती वाऱ्यासारखी पसरत आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा विचार करता यंदा 1901 नंतर ऑगस्ट मध्ये सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 122 वर्षामधील सर्वात कमी पाऊस राहू शकतो . पाऊस कमी पडल्यामुळे खरेदीच्या पिकावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे हवामान विभागाच्या देशामध्ये अनेक भागात भागात आजपासून पावसाला सुरत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज ही दिला आहे तसेच राज्यात इतर भागांमध्ये जोरदार सरी पडण्याचा अंदाज दिला आहे.

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment