News : नाशिक आणि नगर येथील धरणामधून अखेर जायकवाडी धरणासाठी काल अकरा वाजता पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे वरिष्ठ अभियंता नाशिक आणि नगरच्या संबंधित धरणावर पोहोचले असून आवश्यक पाणी सोडण्याची निश्चिती करण्याचे काम ते करणार आहेत.
एकुण ८.६ TMC पाणी सोडण्याचे निर्देश असून त्याचप्रमाणे वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाते, की नाही याची खात्री व देखरेख करण्याचे व हे पाणी मोजून घेण्याचे काम मराठवाड्यातील हे अभियंते करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री अकरा पासून भंडारदरा निळवंडे धरण सुमातून 100 क्यूसेक्स तर धारणा मधून 192 क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आलेले आहे.
कुठल्या धरणांमधून किती पाणी
- मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून २.१० टीएमसी,
- प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून ३.३६ टीएमसी,
- गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), ०.५ टीएमसी,
- गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी
- एकूण ८.६०३ टीएमसी