Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झालेला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावलेले आहेत. विदर्भातील काही भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारचे हजेरी लावली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशाच भारतीय हवामान खात्याने राज्याच्या हवामानाबाबत पुन्हा एकदा मोठी अपडेट दिलेली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Maharashtra Weather Update
भारतीय हवामान खात्याचा अंदाज
- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 30 ते 40 किलोमीटर पर्यंत तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्ट्या निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण केरळ जवळ अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर पर्यंत उंचावर चक्रकार वारांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आणि वादळी वारे जाणवले आहेत.
राज्यातील या भागात पावसाची शक्यता
- भारतीय हवामान खात्याने जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट तसेच ढगाळ हवामानामुळे शेती व दैनंदिन जीवनावर परिणाम होणार असून, काही भागांमध्ये मध्यरात्री पाऊस झालेला आहे त्यामुळे गारवा निर्माण झाला आहे.
शेती पिकाचे नुकसान
अवकाळी पावसाचे सत्र सुरू असल्याने सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. ज्वारी केळी हरभरा यासारख्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकतात. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ज्वारी सारखी पिके जमीनदोस्त झालेले आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झालेले असून, तूर काढणीवर आलेली असताना पावसाची सुरत झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच हरभऱ्याच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
- करडई पिकासाठी आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे असा देखील सल्ला देण्यात आलेला आहे
- तसेच हरभरा पिकासाठी तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
त्यामुळे शेतकरी मित्रांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांचे व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे. यामुळे त्यांना त्यांच्या नुकसानी पासून वाचवण्यास मदत होणार आहे.