krajmafi News : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महिलांना आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. त्यातील एक घोषणा सरकारने पूर्ण केली आहे, आणि एक घोषणा बाकी आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण राबविण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना बंद पडणार नाही अशी आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे शासनाने यापुढेही योजना सुरू ठेवली आहे. आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती सहा हफ्ते यशस्वीरित्या जमा झालेले आहेत. शासनाने डिसेंबर चा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा केलेला आहे. सरकारने त्यांची एक आश्वासन पूर्ण केलेले आहे. krajmafi News
परंतु आता दुसरं आश्वासन कधी पूर्ण करणार असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. ते म्हणजे महायुती सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांची तीन लाख रुपये पर्यंत सरसकट कर्जमाफी करू अशी आश्वासन दिले होते. आता हि कर्ज माफी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. तर चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
2019 पासून जे शेतकरी कर्जबाजारी आहेत, त्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी केली होती. सरकार स्थापन होऊन हिवाळी अधिवेशन ही पार पडली आहे. मात्र अद्याप कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. सरकारने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.
मागील कर्जमाफी
- 2002 पासून आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी करण्यात आलेली आहे. काही वेळा शेतीच्या आकारमानामुळे तर कधी किमान रकमेच्या आधारावर कर्जमाफी करण्यात आली. यामुळे देशभरातील अनेक शेतकऱ्यांना दिल्यास मिळाला आहे.
बँकेचे पुनर्गठन धोरण
- बँकेने पहिल्या कर्जमाफीच्या वेळी मुद्दल आणि व्याजाची एकत्रित बेरीज करून ती रक्कम शासनाला दिली आहे याला पुनर्गठन असे म्हटले आहे. पुनर्गठन मुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले. आता तरी पुनर्गठन शब्द वगळून सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी.
शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या
- शेतकऱ्या मधून आता सरसकट कर्जमाफीची मागणी जोर धरू लागलेली आहे. 2019 पासून असलेले सर्व प्रकारचे शेती कर्ज माफ करावे, बँकाच्या अटी शर्तीवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे लाभ मिळेल याची काळजी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कर्जमुक्त करून त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी द्यावी.
कर्जमाफीचा फायदा
- शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्यामुळे शेतकऱ्यांवरील असलेला मानसिकतान दडपण कमी होईल.
- आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील कमी होईल.
- शेतीमध्ये नव्याने गुंतवणुकीसाठी संधी निर्माण होईल.
- मात्र कर्जमाफी लांबणीवर टाकल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि असमान निर्माण झालेले आहे त्यामुळे कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न देखील वारंवार उपस्थित केला जात आहे.
आशा आणि अपेक्षा
- शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून सरकार स्थापन करण्यास मदत केली आहे त्यामुळे नव्या सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून तातडीने घोषणा करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा उपस्थित केली जात आहे.