Maharashtra Weather Update : राज्यासह देशभरामध्ये हवामानात सातत्याने बदल होत आहे. पूर्वेकडील कमी दाबाची रेषा मालदीव पासून दक्षिण महाराष्ट्र किनार पट्टीपर्यंत आहे. त्यामुळे आग्नेय दक्षिणेकडून येणारे वारे म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यांमध्ये दक्षिण भागात भागाकडून आद्रता येत आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसानंतर उत्तर महाराष्ट्रात व लगतच्या गुजरात व मध्य प्रदेशात विंड इंटरॅक्शन अपेक्षित आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व कोकण गोवा मराठवाडा आणि विदर्भ काही जिल्ह्यात आजपासून पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.
तसेच राज्यातील उत्तर विभाग व आजूबाजूच्या भागात म्हणजे गुजरात मध्य प्रदेश तसेच राजस्थानच्या आग्नेय भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे हिवाळ्यात नागरिक पावसाची अनुभूती घेणार आहेत.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अनुदानुसार कोकण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबईत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 25 नंतर मुंबई ठाणे पालघर येथे मेघा गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. िंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, धाराशिव येथेही पावसाची शक्यता आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा येथे तुरळक तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 तारखेनंतर 27 तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच एक दोन पावसाच्या तीव्र सरी पडण्याच्या शक्यता आहे. 24 ते 27 तारखेला संपूर्ण भागामध्ये तुरळ ठिकाणी मेघगर्जनाचा व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 28 29 तारखेपासून कमी होणार आहे.
पुणे जवळच्या परिसरात आजपासून आकाश अशांत ढगाला राहणार आहे. 25 तारखेनंतर आकाश सामान्य ढगाळ राहील. उद्यापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु 27 पर्यंत हलके ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पावसाचे एक दोन तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. 28 तारखे नंतर पाऊस कमी होणार, तसेच सामान्य तापमान वाढ होणार आहे. तसेच कमाल आणि किमान तापमान कमी असल्यामुळे थंडी जाणवणार आहे.