Maharashtra Rain | मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा कडाका चांगलाच वाढत आहे. यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सहन करावा लागत आहे. त्यातच पुढे काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. पण खरंचच राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे का आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
काही दिवसांपासून हवामान अंदाज बाबत बरच प्रसार माध्यमातून बातम्या झळकत होत्या. परंतु येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळ ठिकाणी हलक्या सारी पडू शकतात असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
राज्यामध्ये 16 तारखेपासून पावसाचा अंदाज वर्तनात असलेली बातम्या समोर येत होत्या त्याच बाबत बोलताना ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, आजपासून चार दिवसानंतर विदर्भामध्ये केवळ अमरावती नागपूर गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये 16 ते 19 मार्च म्हणजे शनिवार ते मंगळवार दरम्यान केवळ ढगाळ हवामान राहणार आहे.
तसेच येता काळामध्ये तुरळ ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे. उत्तर कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडा तसेच विदर्भामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरू नये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता म्हणून बातमी शेतकऱ्यांना पुन्हा येऊ शकते. मात्र शेतकऱ्यांनी विचलित होऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सध्या राज्यामध्ये पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे .व याच महिन्यामध्ये अवकाळी पावसासाठी वातावरण कसे असेल याविषयी बोलताना श्री माणिकराव खुळे म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपीट हंगामाचा कालावधी अजूनही संपलेला नाही.
परंतु खंडित होत जाणाऱ्या पश्चिमी झंजावाच्या साखळ्या आणि एल निनो वर्ष तसेच मार्च मासिक सरासरीपेक्षा कमी पर्जन्याची शक्यता यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गाठीची विशेष अशी शक्यता सध्याच्या व अरबी पीक काढण्याच्या वेळेत जाणार नाही असा अंदाज त्यांनी स्पष्ट केला आहे.