Maharashtra Rain | देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झालेला दिसून येत आहे. देशातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हवामान झालेला बदलामुळे शेतीवर मोठा परिणाम होणार आहे. या बदलामुळे बळीराजा मोठ्या चिंतेमध्ये दिसून येत आहे.
2023 मध्ये नंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले पांढरे सोने आणि सोयाबीन मातीमोल झाले. तसेच राज्यातील रब्बी हंगाम पिकांमधील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले.
तसेच या चालू वर्षात देखील सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. परंतु या अवकाळी पावसाचा फारसा काही असर रब्बी हंगाम पिकावर झाला नाही.
परंतु वर्षातच भारतीय हवामान विभागाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी नुकताच एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेला हवामान अंदाज मध्ये येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
या अंदाजामुळे महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचे तांडव पाहायला मिळणार आहे अशी देखील हवामान अंदाज वर्तवलेला आहे.
भारतीय हवामान विभाग अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये देशात अरुणाचल प्रदेश काही भागात हिमालय पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम मेघालय नागालँड मिझोरम मणिपूर तसेच त्रिपुरा या राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच आयएमडीने महाराष्ट्रात देखील सुद्धा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. राज्यात सध्या दुपारी उन्हाची चटके बसत आहेत तर सकाळी गारठा जाणवत आहे. मात्र, आता राज्यात शुक्रवारपासून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मराठवाडा विदर्भ या भागात पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. शुक्रवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पाऊस कायम राहणार असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. या कालावधीत राज्यातील संपूर्ण विदर्भ भागात ढगाळ हवामान तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार व तसेच ढगांच्या गडगडाटासह सह मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील प्रमुख जिल्ह्यामध्ये नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ वाशिम पावसाची शक्यता अधिक असणार आहे. आणि मराठवाडा बद्दल बोलायचे झाल्यास नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.