Ration Card New Update: रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील गोरगरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देण्यासाठी रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात दिल्या जातात. या योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई केवायसी करण्याच्या सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना ते अनिवार्य असून त्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्या नागरिकांना धान्य मिळणे बंद होणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना स्वस्त अन्न मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण व ई केवायसी प्रक्रिया गावोगावी शिबिर आयोजित करून केली जात आहे. शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी शिबिरात अथवा आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन प्रथम आधार कार्ड दाखवून अंगठ्याद्वारे आपल्या आधार कार्डची ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत असून त्यानंतर धान्य दिले जाणार नाही. अशा सूचना दुकानदारांनाही देण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी दरमहा सात तारखेला अन्नदिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप करायचे आहे.
कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना धान्य पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्याप रेशन कार्ड नसलेल्या केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टल वरील नोंदणीकृत स्थलांतरित व असंघटित कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका देण्याचे निर्धारण देण्यात आले आहेत. मिळालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामधून तातडीने शिधापत्रिका देण्याचे काम सुरू केले गेले आहे. त्यामुळे ज्यांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. मात्र त्यांना शिधापत्रिका मिळत नाहीत अशा नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह जवळच्या तहसील कार्यालयातून आपली शिधापत्रिका मिळवावी.
ई केवायसी कुठे करावी?
देशात “वन नेशन वन रेशन” अंतर्गत राज्यातील लाभार्थी जवळच्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन मोफत धान्य मिळवू शकतात. त्या लाभार्थ्यांनी त्याच स्वस्त धान्य दुकानात ई केवायसी करून घ्यावी. त्याचबरोबर ते नागरिक आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन देखील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. Ration Card New Update
शिधापत्रिका धारकांच्या सर्व लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत आधार प्रमाणीकरण व ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. कुठल्याही शिबिरात किंवा रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीत या दोन्ही बाबींची पूर्तता न केल्यास मोफत धान्य दिले जाणार नाही.