Maharashtra News : मित्रांनो राज्यामध्ये नवीन 22 जिल्हे व 49 तालुके यांची निर्मिती होणार. अशी बातमी आपल्या कानावर आली असेलच. याच संदर्भात राज्यातील विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेक आमदारांनी या जिल्ह्यांचा व तालुक्यांचा विषय हा लावून धरलेला आहे. गावापासून लांब असलेले जिल्हे व तालुके यांच्या प्रशासकीय कामदरम्यान निर्माण होत आहे. यासाठी अधिक पैसा व वेळ लागतो. असं अनेक नागरिकांकडून ऐकायला भेटतं.
तेथिल स्थानिक मानतात की, आमचं गाव हे मोठा आहे. त्यामुळे आम्हाला अनेक वर्षांपासून तालुक्याची मागणी आहे. व ती तुम्ही पुरी करावी, याच बाबतीत महाराष्ट्रात नवीन जिल्हे व तालुक्यांची निर्मिती असेल का? जर होत असेल तर, ती किती व कशाप्रकारे आहे. याची माहिती आपण घेणार आहोत.
जिल्ह्याची तर नाहीच प,ण तालुक्याची निर्मिती तर होणार. राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन हे 2023 डिसेंबर मध्ये पार पडले होते. ते पण नागपूर मध्ये या अधिवेशनादरम्यान आमदार आशिष जयस्वाल यांनी 19 डिसेंबर 2023 मध्ये याची लक्षवेधी मांडली होती. ते असे म्हणाले होते की, देवलापार हा अतिशय दुर्गम आदिवासी तालुका आहे. या तालुक्यामध्ये संपूर्ण 72 गाव ही आदिवासी आहेत. त्याचप्रमाणे इथल्या लोकांना तहसील ही लांब असल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. त्यामुळे येथे विशेष म्हणजे नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात यावी असे त्यांनी स्पष्ट केला आहे.
कोकण मधील विभागाचे विभागीय आयुक्त त्यांची एक समिती ही स्थापन करण्यात आलेली होती. पदांच्या निर्मिती निश्चित करण्यासाठी मोठ्या व माध्यम आणि छोट्या तालुक्याला ही पदे द्यायची हे त्यांनी ठरवण्यात आलं.
यामध्ये 24 पद हे मोठ्या तालुक्याला आणि 23 पदं हे मध्यम तालुक्याला आणि जर सर्वात छोटा तालुका असेल. तर, 20 पदं निश्चित करण्यात आले आहेत.
राज्यातील नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा प्रस्ताव नाही.
नाना पटोले यांनी या झालेल्या बैठकीदरम्यान व चर्चेदरम्यान की राज्यातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती बाबतचा प्रश्न व्यक्त केला आहे. यामध्ये राज्य सरकारने या नवीन जिल्ह्याच्या निर्मिती बाबतचा प्रश्न घेतलेला आम्हाला समजलं आहे. तर, या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत सरकारची काय भूमिका आहे ? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे.
याच प्रश्नाला उत्तर देताना, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केले आहे. की, नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती संदर्भात अजून कोणतेही धोरण शासनासमोर आलेले नाही. जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी येणारा प्रचंड मोठा खर्च व मुख्यालयाचे ठिकाण यावरून होणारे वादविवाद असे अनेक प्रश्न त्यामध्ये सामावून येतात.
नवीन निर्मिती होणाऱ्या तालुक्याची प्रक्रिया ही कशी असु शकते?
तालुक्याच्या निर्मितीसाठी साधारणपणे दोन मार्ग असतात.
तालुके निर्माण करण्यासाठी शासन हे स्वतः एका समितीची स्थापना अभ्यासासाठी करत असते. आणि जर या समितीमधून अहवाल आला तर शासन त्यातील निकष पाहून तालुकां निर्मितीचा धोरण हे जारी करत असतं.
आणि दुसरं म्हणजे, जिल्हाधिकारी हा शासनाकडे तालुक्याच्या निर्मितीसाठी या तालुक्याबाबत चा प्रस्ताव पाठवू शकतात. व शासन त्यावर त्यांच्याप्रमाणे निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करतात.